दैनिक स्थैर्य । दि. २३ जून २०२३ । मुंबई । फिजिक्सवाला (पीडब्ल्यू)ने दक्षिण भारतातील आपली उपस्थिती दृढ करण्यासाठी केरळमध्ये मुख्यालय असलेली झपाट्याने विकसित होणारी एड-टेक कंपनी झायलेम लर्निंगसोबत धोरणात्मक सहयोगाची घोषणा केली आहे. २६ वर्षीय एमबीबीएस पदवीधर डॉ. अनंतू यांनी स्थापना केलेली झायलेम लर्निंग विद्यार्थ्यांना सर्वोत्तम व दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देते, ज्यामुळे ही गेल्या दोन वर्षांमध्ये केरळमधील सर्वात मोठी ऑनलाइन व हायब्रिड कंपनी बनली आहे. या सहयोगाचा दक्षिण भारतातील विद्यार्थ्यांना अद्वितीय अध्ययन अनुभव देण्याचा मनसुबा आहे.
पीडब्ल्यूचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अलख पांडे म्हणाले, ‘‘झायलेम लर्निंगसोबतचा हा सहयोग माझ्यामध्ये अधिक उत्साह व अभिमान निर्माण करतो. हा सहयोग सर्वांना दर्जेदार शिक्षण देण्याच्या आमच्या समान दृष्टिकोनाशी संलग्न असण्यासोबत आम्हाला दक्षिण भारतातील आघाडीचे शैक्षणिक व्यासपीठ बनवण्याच्या आमच्या धोरणात्मक ध्येयाजवळ देखील घेऊन जातो. पुढील ३ वर्षांमध्ये आम्ही आसपासच्या इतर राज्यांमध्ये धाडसी व अद्वितीय ‘झायलेम मॉडेल ऑफ हायब्रिड लर्निंग’चा विस्तार करण्यासाठी ५०० कोटींची गुंतवणूक करू. ही अध्ययनाची विशेष परिणाम-केंद्रित योजना आहे, जिने विशेषत: मला प्रभावित केले आहे. हे ध्येय साध्य करण्यासाठी प्रबळ टीम निर्मिती, कन्टेन्ट विकास, तंत्रज्ञान नाविन्यता, इतर श्रेणींमध्ये विस्तारीकरण आणि हायब्रिड सेंटर्सची गरज असेल. आम्ही दक्षिणेकडील एमअॅण्डएकडे देखील लक्ष देऊ. डॉ. अनंतू दक्षिणेकडील आमच्या विस्तारीकरणाचे मशालवाहक असतील. माझ्या मते, झायलेम लर्निंग दक्षिणेकडील पीडब्ल्यूसारखे आहे आणि हीच बाब या सहयोगाला अधिक अर्थपूर्ण बनवते. डॉ. अनंतू दक्षिणेकडील विस्तारीकरणाचे मशालवाहक असतील.’’
पीडब्ल्यू व झायलेम यांची सर्वांसाठी दर्जेदार शिक्षणाचे लोकशाहीकरण करण्याच्या समान दृष्टिकोनासह स्थापना करण्यात आली. या सहयोगामधून भारतभरात दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देण्याचे त्यांची संयुक्त मिशन दिसून येते. तंत्रज्ञान व ज्ञानाच्या देवाणघेवाणीवर निर्माण करण्यात आलेला हा सहयेाग दक्षिण भारतातील जेईई/नीट इच्छुकांना सर्वोत्तम अध्ययन अनुभव देण्याकरिता दोन्ही व्यासपीठांच्या क्षमतांचा फायदा घेतो. पीडब्ल्यूने किफायतशीर दरामध्ये उच्च दर्जाचे शैक्षणिक आशय देण्याकरिता तंत्रज्ञानाचा वापर करण्यामध्ये ट्रेलब्लेझर म्हणून स्वत:चे नाव स्थापित केले आहे.
झायलेम लर्निंगचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अनंतू म्हणाले, ‘‘आम्हाला पीडब्ल्यूसोबत सहयोग करण्याचा, त्यांच्या तंत्रज्ञान क्षमता आणि शाश्वत व्यवसाय मॉडेल निर्माण करण्याचे आमचे समान ध्येय ओळखण्याचा आनंद होत आहे. अलख पांडे यांचा दृष्टिकोन आमच्याशी परिपूर्णपणे संलग्न होतो, जेथे आम्ही दोन्ही संस्था विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण किफायतशीर दरात उपलब्ध करून देण्याप्रती कटिबद्ध आहोत. आमच्या प्रयत्नांना एकत्र करत आमचा दृढ विश्वास आहे की, आम्ही नीट व जेईई परीक्षांसाठी तयारी करणाऱ्या महत्त्वाकांक्षी विद्यार्थ्यांच्या जीवनात मोठा सकारात्मक परिणाम घडवून आणू शकतो. हा सहयोग किफायशीरपणा, विश्वास आणि शिक्षणाचे लोकशाहीकरण या तत्त्वांद्वारे संचालित आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक प्रवासामध्ये सर्वोत्तम अध्ययन संसाधने व अविरत पाठिंबा देण्याचा आमचा उद्देश आहे.’’