
दैनिक स्थैर्य । दि. ०३ मार्च २०२२ । पुसेगाव । पुसेगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सोमवारी रात्री मोटर सायकल चोरून नेणाऱ्या आरोपीला पुसेगाव पोलिसांनी 24 तासाच्या आत गजाआड केले. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार हणमंत भगवान पाटोळे रा. दिवडी, ता. माण असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. केदारसिंह दिलीप तारळकर यांच्या राहत्या घरासमोरून रात्रीच्या वेळी दुचाकी MH 11BS 3521 चोरीला गेली होती. सीसीटीव्ही फूटेज तसेच मिळालेल्या माहितीच्या आधारे दिवडी ता. माण येथील हणमंत भगवान पाटोळे याला अटक करून त्याच्याकडील 65000 रुपये किमतीची चोरलेली दुचाकी ताब्यात घेतली.
या कारवाईत सपोनी शितोळे, उपनिरीक्षक बाळासाहेब लोंढे, सुनील अब्दागिरी, वैभव वसव, सचिन जगताप, विजय खाडे, विपुल भोसले, पुष्पा पाटील यांनी सहभाग घेतला.