दैनिक स्थैर्य | दि. २० डिसेंबर २०२४ | फलटण |
फलटण एस. टी. स्टॅण्डवर दि. २ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी ४.०० वाजण्याच्या सुमारास निंबळक बसमध्ये चढत असताना सुमारे ४८,०८६/- रुपये किमतीची सोन्याचे दागिने असलेली पर्स चोरट्याने लंपास केल्याची फिर्याद सौ. आशा सुभाष निंबाळकर (वय ६०, रा. निंबळक, ता. फलटण) यांनी फलटण शहर पोलीस ठाण्यात दिली आहे.
सौ. आशा निंबाळकर या निंबळक बसमध्ये बसल्यानंतर तिकिटाचे पैसे काढण्यासाठी त्यांनी पर्स पाहिली, त्यावेळी मला पर्सची चेन उघडलेली दिसली.
चोरीस गेलेल्या पर्समध्ये
१) ८,१९२/- रु. किंमतीचे २४ ग्रॅम ९६० मिली वजनाचे सोन्याच्या साखळीमध्ये काळे मनी असलेले व त्याला सोन्याचे पदक असलेले गंठण जु. वा. किं.अं.
२) ५,९३०/- रू. किंमतीचे १८ ग्रॅम ३२० मिली वजनाच्या सोन्याच्या ०२ बांगड्या जु. वा. कि.अं.
३) ९६४/- रू. किंमतीची ३ ग्रॅम वजनाची हाताच्या बोटातील सोन्याची अंगठी जु. वा. किं.अं.
४)३३,०००/- रू. किंमतीच्या ५ ग्रॅम ४४० मिली वजनाच्या हाताच्या बोटातील ३ लेडीज अंगठ्या
असे एकूण ४८,०८६/- रुपये किमतीचे दागिने होते.
या चोरीचा अधिक तपास महिला पोलीस हवालदार पूनम बोबडे करत आहेत.