कोरोना पासून बचाव करण्यासाठी अनपटवाडी गावात देशी गाईचे शुद्ध दूध व तूप उपलब्ध

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, फलटण : सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेमध्ये कोरेगाव तालुक्यातील अनपटवाडी या गावाने चार वर्षांपूर्वी भाग घेतला होता. सातत्याने गेली चार वर्ष हे गाव आतिशय चांगल्या पद्धतीने कार्यरत आहे. अनपटवाडी या गावात कित्येक वर्षे टँकर लागत होते. उन्हाळा चालू झाला कि टँकर शिवाय या गावात कोणताही पर्याय नसायचा परंतु सत्यमेव जयते या वॉटर कप या स्पर्धेमध्ये अनपटवाडी या गावाने समावेश केल्यानंतर संपूर्ण गावाचा कायापालट झाला असून आता गाव हे पाण्याचा उपयोग सर्व जण योग्य रित्या करीत आहे. कोरोनामुळे सध्या सगळ्यांचच आयुष्य अस्थिर झालंय. हळूहळू औषधं मिळू लागल्याच्या बातम्या येत आहेत. मात्र, हे संकट पूर्णपणे जाईल याची अजून तरी शाश्वती मिळालेली नाही. त्यामुळे सामान्यपणे जगण्यावरचे निर्बंध कायम आहेत. यातून बाहेर पडण्यासाठी काही उपयांचा सध्या अवलंब करावा लागेल. हे सगळं कधी संपणार? आपलं आयुष्य पूर्वपदावर कधी येणार? या प्रश्नांनी तुम्हा – आम्हालाच नव्हे तर जगातल्या प्रत्येकाला ग्रासून टाकलंय.

पण या संकटातून बाहेर पडायचं असेल तर आता देशी गायीच्या दुधाला व त्या पासून तयार करण्यात आलेल्या पदार्थांना पर्याय नाही हेच ओळखून अनपटवाडी गावातील शेतकऱ्यांनी देशी गाई घेतलेल्या आहेत. त्याचे दूध, तूप विक्रीसाठी ते सध्या गावकऱ्यांनी उपलब्ध करून दिले आहे. अनपटवाडी हे गाव कोरेगाव तालुक्यातील अंबावडे फाट्यावरून डावीकडे वळल्यावर वाघोली गाव लागते याच्या जवळ आहे. कोरोना पासून बचाव करण्यासाठी शुद्ध देशी गाईचे दूध, तूप कोणाला हवे असल्यास अनपटवाडी गावचे सरपंच मनोज अनपट (मो. बा.: 9226115026) यांना संपर्क करावा, असे आवाहन ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आलेले आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!