
दैनिक स्थैर्य । दि. २७ मे २०२२ । फलटण । पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त फलटण येथे दि. ५ जून रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली फलटण तालुक्यामध्ये राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त विविध कार्यक्रम भव्य दिव्य स्वरूपात संपन्न होणार आहे, अशी माहिती राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव समितीच्या माध्यमातून देण्यात आली.
दि. ५ जुन रोजी सकाळी ८ वाजता सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा फलटण तालुका राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर समितीचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये फलटण शहरामधील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकामध्ये प्रतिमेचे पूजन संपन्न होणार आहे.
दि. ५ जुन रोजी सायं. ६ वाजता विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते तर आमदार दीपक चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा फलटण तालुका राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, पंचायत समितीचे माजी सभापती श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत फलटण येथील राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकामधुन भव्य – दिव्य शाही मिरवणूकीचा शुभारंभ करण्यात येणार आहे.
राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त शाही मिरवणूक फलटण येथील राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकामधुन आरंभ होणार असुन नाना पाटील चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, महावीर स्तंभ, आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक चौक मार्गे जावुन गजानन चौक येथे समारोप होणार आहे.
राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त शाही मिरवणूकीत पुणे येथील प्रसिद्ध असलेला ओंकार ७२ डीजे, झांजपथक, गझीनृत्याचे ५ पथके, तुतारी वादकांचे पथक व विविध प्रकारचे नृत्याविष्कार सादर होणार आहेत. तरी फलटण शहरासह फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील सर्व नागरिकांनी उत्स्फूर्त पणे सहभागी व्हावे असे आवाहन समितीच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे.
राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी अखंड हिंदुस्थानामध्ये सर्व जाती व धर्म यांच्या हिताचा दृष्टीकोनातुन आपला राज्यकारभार केलेला होता. तरी त्यांच्या साजर्या होत असलेल्या जंयती मध्ये सर्व घटकातील नागरिकांनी सहभागी व्हावे, असेही आवाहन जंयती उत्सव समितीच्या माध्यमातून करण्यात आले आहे.