४५ एकर जमीन त्वरित विकणे आहे
फलटण - सातारा रोडवर मलवडी गावाच्या
रस्त्यालगत, निसर्गरम्य, वीज, पाणी असलेली
प्रदूषणमुक्त ४५ एकर जमीन योग्य किमतींस
त्वरित विकणे आहे.
संपर्क : 8888006611 (WhatsApp)
दैनिक स्थैर्य | दि. ६ मार्च २०२३ | फलटण |
राज्य शासनाच्या महिला व बाल विकास विभागातर्फे दिला जाणारा ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राज्यस्तरीय पुरस्कार २०१४-१५’ हा फलटण शहरातील श्रीमती वासंती महामुलकर यांना जाहीर झाला आहे. या पुरस्कारासाठी निवड झाल्याचे पत्र श्रीमती महामुलकर यांना प्राप्त झाले असून जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय सातारा यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
जागतिक महिला दिनाचे (दि. ८ मार्च रोजी) औचित्य साधून गेट वे ऑफ इंडिया, मुंबई या ठिकाणी सायंकाळी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून श्रीमती वासंती महामुलकर यांना वरील पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.