पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्यासारखं कर्तृत्व विद्यार्थिनींनी शिक्षण क्षेत्रात सिध्द करावे – वासंती जगदाळे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. १९ जुलै २०२३ | फलटण |
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्यासारखं कर्तृत्व विद्यार्थिनींनी शिक्षण क्षेत्रात सिध्द करावे, असे प्रतिपादन एसटीच्या आगार व्यवस्थापक सौ. वासंती जगदाळे यांनी केले.

फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मोफत त्रैमासिक पास योजनेंतर्गत विद्यार्थिनींना मोफत एसटी पासचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या.

सौ. जगदाळे मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या की, विद्यार्थिनींना मोफत एसटी पास ज्या रणरागिणीच्या नावाने दिला जातो, त्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्यासारखंच प्राविण्य आपण शिक्षण क्षेत्रात मिळविले पाहिजे.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सहाय्यक वाहतूक निरीक्षक फलटण आगारचे राजेंद्र वाडेकर यांनी त्यांच्या मनोगतातून विद्यार्थिनींना महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळामार्फत दिल्या जाणार्‍या योजनांची सविस्तर माहिती दिली. तसेच एसटी पासचा वापर करीत असताना प्रवासात काही अडचणी आल्यास आपण फलटण आगाराशी संपर्क साधावा. त्या त्या वेळी तुमच्या समस्यांचे निवारण केले जाईल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. तसेच पासेसचा वापर शैक्षणिक कामासाठीच करावा, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

यावेळी मान्यवरांचे स्वागत व सत्कार मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य बाबासाहेब गंगवणे यांनी केले. याप्रसंगी बोलताना ते म्हणाले की, आमच्या विद्यालयात येणार्‍या विद्यार्थिनी या बहुतांश ग्रामीण भागातून जास्त प्रमाणात येत असतात, म्हणून त्यांना विद्यालयामार्फत वेळेत मोफत पास उपलब्ध करून दिले जातात. तसेच फलटण एसटी महामंडळाच्या अधिकारी व कर्मचार्‍यांचे आम्हाला वेळोवेळी सहकार्य लाभते. एसटी पाससाठी आमच्या परिवहन विभाग समितीचे प्रमुख प्रा. सुधाकर वाकुडकर , चेतन बोबडे सर, राजाभाऊ गोडसे सर हे आपली जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडतात. त्याबद्दल त्यांच्या कामाचे कौतुक प्राचार्यांनी यावेळी केले.

कार्यक्रमात १८० विद्यार्थिनींना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मोफत एसटी पासचे मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले. यावेळी उपप्राचार्य श्री. ज्ञानदेव देशमुख सर, प्रा. संदीप पवार सर, प्रा. अनिकेत गायकवाड सर, प्रा. ज्ञानेश्वर बोंद्रे सर हे मान्यवर उपस्थित होते.

सूत्रसंचालन प्रा. संदीप पवार सर यांनी केले, तर आभार उपप्राचार्य श्री. ज्ञानदेव देशमुख सर यांनी मानले.


Back to top button
Don`t copy text!