स्थैर्य, नवी दिल्ली, दि.९: 26 जानेवारी रोजी लाल किल्ल्यात झालेल्या हिंसाचारप्रकरणी अटकेत असलेला पंजाबी अभिनेता दीप सिद्धूला कोर्टाने 7 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने मंगळवारी त्याला कोर्टात हजर केले होते. लाल किल्ल्यात हिंसाचाराला प्रवृत्त करण्यासाठी सिद्धू हा मुख्य आरोपींपैकी एक असल्याचे पोलिसांनी कोर्टात सांगितले. पोलिसांनी दहा दिवसांची कोठडी मागितली होती, मात्र न्यायालयाने 7 दिवसांची कोठडी सुनावली.
दीप सिद्धूला पोलिसांनी सोमवारी रात्री 10.40 वाजता करनाल बायपास येथून अटक केली होती आणि मंगळवारी सकाळी अटकेची माहिती दिली. सिद्धूवर लाल किल्ल्यात आंदोलकांना भडकावण्याचा आरोप आहे. लोकांनी किल्ल्याच्या तटबंदीवर धार्मिक झेंडा लावला होता. हिंसा घडवली होती.
मैत्रिणीच्या माध्यमातून सोशल मीडियावर व्हिडिओ अपलोड करत होता
लाल किल्ल्याच्या घटनेनंतर सिद्धू फरार होता, पण सोशल मीडियावर सातत्याने व्हिडिओ अपलोड करत होता. पोलिसांनीही त्यांच्यावर 1 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. वृत्तसंस्थेच्या सूत्रांच्या माहितीनुसार, सिद्धू कॅलिफोर्नियातील आपल्या एका मित्राशी संपर्कात होता. त्या मैत्रिणीद्वारे फेसबुकवर व्हिडिओ अपलोड केले जात होते. सोबतच पोलिसांना चकवा देण्यासाठी वारंवार ठिकाणं बदलत होता.