थुंकणाऱ्या व्यक्ती, मास्क न वापरणाऱ्या व्यक्ती तसेच सोशल डिस्टंसिंग न पाळणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करणार : प्रसाद काटकर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, फलटण : कोरोना रोगाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने फलटण नगर परिषद क्षेत्रातील प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना म्हणून शहरातील सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या व्यक्ती, मास्क न वापरणाऱ्या व्यक्ती तसेच सोशल डिस्टंसिंग न पाळणाऱ्या व्यक्ती यांच्यावर दंडात्मक कारवाई करणे कामी फलटण नगरपालिकेने ४ पथकांची पथकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. फलटण शहरांमध्ये फिरताना मास्कचा वापर न करणाऱ्या व्यक्तींवर ५०० रुपये दंड,  सार्वजनिक अथवा खासगी जागेच्या ठिकाणी थुंकल्यास १००० रुपये दंड, दुकानांमध्ये प्रत्येक ग्राहकांमध्ये किमान ६ फूट अंतर राहील याची खात्री करावी तसेच दुकानांमध्ये एका वेळी ५ पेक्षा जास्त व्यक्तींना घेण्यास मनाई आहे. सदर आदेशाचे उल्लंघन झाल्यास प्रथम वेळी १००० रुपये दंड दुकानदाराने दुसऱ्यांदा उल्लंघन केल्यास दोन २००० रुपये दंड व तिसऱ्यांदा उल्लंघन झाल्यास दुकानाचा परवाना ३ दिवसासाठी निलंबित करून दुकान ३ दिवसासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. सर्व दुकानदार फळे भाजी विक्रेते यांनी हॅण्ड ग्लोज, मास्क याचा वापर करावा तसेच दुपारी २ वाजता आपले दुकान व हातगाडे बंद करावेत दुपारी २ नंतर दुकान अथवा बाजारपेठ फळ विक्रेते (हात गाडे) दिसुन आल्यास त्यांच्यावर दंडामक्त कार्यवाही करुन हातगाड्या परवाना रद्द करण्यात येणार आहे. अशी माहिती फलटण नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांनी दिली.

गृह विलीगीकरण म्हणजेच होम क्वारंटाईन केलेल्या व्यक्तींनी कोणत्याही परिस्थितीत १४ दिवस पूर्ण झाल्याशिवाय शहरांमध्ये फिरू नये. फिरताना निदर्शनास आल्यास त्यांच्यावरही दंडात्मक कारवाई केली जाईल. तसेच शहरातील कोणत्याही नागरिकांना सर्दी, खोकला, ताप असल्यास ताबडतोब नगर परिषदेच्या दवाखान्यात अथवा ग्रामीण रुग्णालयाशी संपर्क साधावा. कोणताही ताप अंगावरती काढू नये. असेही प्रसाद काटकर यांनी स्पष्ट केले. 


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!