मास्क न वापरणाऱ्या वर वडूज नगरपंचायतीने केली  दंडात्मक कारवाई; १लाख ६२ हजार रुपयांचा दंड वसूल

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, वडूज, दि.७: जिल्हाधिकारी शेखरसिंह यांच्या आदेशानुसार मास्क न वापरणे, दुकानात गर्दी करणे, उघड्यावर थुंकणे ,सोशल डिस्टंसिंग चे पालन न करणे या विविध कारणाकरिता वडूज नगरपंचायतीने आतापर्यंत १ लाख ६१ हजार ४०० रुपये दंड केला आहे. या दंडात्मक कारवाईचा भाग म्हणून श्री शैलेश सूर्यवंशी – इन्सिडेंट कमांडर तथा उपविभागीय अधिकारी मान खटाव यांनी आदेश करताच दिनांक ६ सप्टेंबर रोजी मास्क न वापरणाऱ्या १७ लोकांकडून प्रत्येकी ५00 असा एकूण आठ हजार पाचशे रुपये दंड गोळा केला आहे. तसेच आतापर्यंत सोशल डिस्टंसिंग चे पालन न करणाऱ्या कडून पंचवीस हजार रुपये दंड गोळा केला आहे. नूतन प्रांताधिकारी मान खटाव यांनी या कारवाया दररोज करण्याचे आदेश दिले आहेत. यासाठी सर्व नागरिकांनी पूर्णपणे कोरोणाच्या संदर्भात ज्या काही सूचना केल्या आहेत त्याचे पूर्णपणे पालन करण्याचे आवाहन केले आहे. सध्या *माझे कुटुंब माझी जबाबदारी* ही मोहीम चालू आहे त्या अनुषंगाने सर्वेक्षणासाठी आलेल्या सर्व पथकांना नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन मुख्याधिकारी वडूज नगरपंचायत वडूज माधव खांडेकर यांनी केले आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!