
दैनिक स्थैर्य । दि. ४ जुलै २०२१ । सातारा । जिल्हाधिकार्यांच्या आदेशाचा भंग करत रात्री उशिरापर्यंत हॉटेल सुरू ठेवल्याप्रकरणी बोरगाव पोलिसांनी दोन हॉटेल व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई केली.त्यांच्याकडून एकूण वीस हजार रुपयांचा दंड वसूल केला.शुक्रवारी रात्री उशिरा सपोनि डॉ. सागर वाघ, हवालदार राकेश देवकर व चालक धनंजय जाधव हे महामार्गावर पेट्रोलिंग करत असताना त्यांना माजगाव फाटा (ता. सातारा) येथील हॉटेल राजमुद्रा व खोडद फाटा (ता. सातारा) येथे हॉटेल नवमी हे उघडे असून तेथे काही ट्रॅव्हल्स थांबलेल्या व प्रवासी जेवत असल्याचे निदर्शनास आले. यावेळी पोलिसांनी दोन्ही हॉटेल चालकांना जिल्हाधिकारी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी प्रत्येकी दहा हजार रुपयांचा दंड करून तो तात्काळ वसूल केला.