स्थैर्य, फलटण : जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या सातत्याने वाढत असून गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये सर्वाधिक संख्या ही अमेरिकेतील रुग्णांची आहे. भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या कोरोनामुळे आतापर्यंत पाच लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर तब्बल एक कोटीहून लोकांना त्याचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या सात लाखांच्या वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात 20 हजारहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी घराबाहेर पडताना मास्क लावणं आवश्यक आहे. अनेक ठिकाणी मास्क लावणं अनिवार्य करण्यात आलं असून न लावल्यास दंड आकारण्यात आला आहे. सुरक्षेच्या दृष्टीने मास्क लावणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जागतिक आरोग्य संघटनेने तोंडाला मास्क लावण्याबाबत नवीन निर्देश जारी केले आहेत. आसू ता.फलटण येथील ग्रामपंचयतीचीच्या भरारी पथकाने सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांच्या सहकार्याने मास्क न घालणाऱ्यांवर ५०० रुपये दंड केला आहे.
आसू ता. फलटण येथे कोरोनाचे २ रुग्ण आढळून आल्याने सर्व नागरिकांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शासनाकडून विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत. त्या मध्येच काही नागरिक तोंडाला मास्क न लावता फिरताना पाहायला मिळत आहे. या मध्येच आसू ग्रामपंच्यातीने भरारी पथकाच्या मदतीने धडक कारवाई करण्यास सुरुवात केली असून मंगळवार दि.१४ जुलै रोजी १५ नागरिकांवर कारवाई करून ७५०० रुपये दंडाची वसुली केली आहे.
आसू येथे बस स्टँड परिसरात ग्रामपंच्यातीने व भरारी पथकाने गावात येणाऱ्या व गावातून बाहेर जाणाऱ्या व्यक्तीच्या तोंडाला मास्क नसल्याच ५०० रुपये दंड आकरण्यास सुरवात केलेली आहे. घरातून बाहेर पडताना तोंडाला मास्क लावून बाहेर पडण्याचे आवाहन आसू ग्रामपंचायतीन केले आहे.
आसू ता. फलटण येथे कोरोनाचे २ रुग्ण आढळून आल्याने सर्व नागरिकांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शासनाकडून विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत. त्या मध्येच काही नागरिक तोंडाला मास्क न लावता फिरताना पाहायला मिळत आहे. त्या मुळे आसू गावामध्ये कोणी मास्क न लावता फिरताना दिसल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल.
महादेव सकुंडे,
सरपंच, ग्रामपंचायत आसू