स्थैर्य, फलटण : शहरातील सर्व दुकानदार, फळे भाजी विक्रेते, तसेच शहरातील सर्व नागरिक यांनी कोरोना रोगाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने फलटण नगर परिषद क्षेत्रातील प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना म्हणून शहरातील सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या व्यक्ती, मास्क न वापरणाऱ्या व्यक्ती तसेच सोशल डिस्टंसिंग न पाळणाऱ्या व्यक्ती यांच्यावर दंडात्मक कारवाई करणे कामी फलटण नगरपालिकेने ४ पथकांची पथकांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती फलटण नागपालिकेचे मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांनी प्रसिद्धिपत्राद्वारे दिली आहे.
फलटण शहरांमध्ये फिरताना मास्कचा वापर न करणाऱ्या व्यक्तींवर ५०० रुपये दंड तर सार्वजनिक अथवा खासगी जागेच्या ठिकाणी थुंकल्यास १००० रुपये दंड त्या सोबतच दुकानांमध्ये प्रत्येक ग्राहकांमध्ये किमान ६ फूट अंतर राहील याची खात्री करून तसेच दुकानांमध्ये एकाच वेळी ५ पेक्षा जास्त व्यक्तींना घेण्यास मनाई करण्यात आलेली आहे. आदेशाचे पहिल्यांदा उल्लंघन झाल्यास १००० रुपये दंड, दुकानदाराने दुसऱ्यांदा उल्लंघन केल्यास दोन २००० रुपये दंड व तिसऱ्यांदा उल्लंघन झाल्यास दुकानाचा परवाना ३ दिवसासाठी निलंबित केला जाणार आहे. सर्व दुकानदार फळे भाजी विक्रेते यांनी हॅण्ड ग्लोज, मास्क याचा वापर करावा तसेच सायंकाळी ५:०० वाजता आपले दुकान व हातगाडे बंद करावेत. सायंकाळी ५ नंतर दुकान अथवा बाजारपेठ फळ विक्रेते (हात गाडे) दिसुन आलेस त्यांच्यावर दंडामक्त कारवाई करुन हातगाड्याचा परवाना रद्द करणेत येणार आहे. तसेच होमक्वारंटाईन केलेल्या व्यक्तींनी कोणत्याही परिस्थितीत त्यांचा विलीगीकरणाचा कालावधी पूर्ण झाल्याशिवाय शहरामध्ये फिरू नये तसे फिरताना निदर्शनास आल्यास त्यांच्यावरही दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.