दैनिक स्थैर्य । दि. २७ नोव्हेंबर २०२२ । सातारा । सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा शाबीत झाल्याने कुमार उर्फ आनंद निळकंठ भोईटे व 29 व अक्षय राजेंद्र भोईटे वय राहणार वाघोली तालुका कोरेगाव यांना सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायालयाने पाचशे रुपये दंड व दंड न दिल्यास एक आठवडा साधी कैद, कलम 332 नुसार प्रत्येकी पाचशे रुपये दंड व दंड न दिल्यास एक आठवडा साधी कैद अशी शिक्षा सुनावली दुसरे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश एस आर सालकुटे यांनी हे आदेश दिले.
या खटल्याची अधिक माहिती अशी दिनांक 18 ऑक्टोबर २०१२ रोजी आरोपी कुमार भोईटे व राजेंद्र भोईटे यांनी एका भांडणाच्या प्रकरणात एसटी पोलीस स्टेशनला घेण्यास एसटी ड्रायव्हरला सांगितले परंतु एसटी चालकाने नकार दिल्याने त्याचा राग मनात धरून फिर्यादी अशोक खाशाबा मांडवे वय 56 राहणार वाठार तालुका कोरेगाव यांना केबिनमध्ये जाऊन शिवीगाळ केली व एसटी बसची काच फोडण्यात आली अक्षय भोईटे यांनी कंडक्टर राजेश धुमाळ याला हाताने मारहाण केली याप्रकरणी वाठार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. सहाय्यक पोलीस फौजदार यु एस पवार यांनी याप्रकरणी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
या खटल्यात परिस्थितीजन्य पुरावा आणि अन्य साक्षीदारांची साक्ष सरकारी वकिलाचा युक्तिवाद ग्राह्य म्हणून अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश एस आर सालकुटे यांनी आरोपींना 500 रुपये दंड व एक आठवडा साधी कैद व कलम 332 प्रमाणे प्रत्येकी पाचशे रुपये दंड व दंड न दिल्यास एक आठवडा साधी कैद अशी शिक्षा ठोठावली या खटल्यात पैरवी अधिकारी म्हणून प्रकाश चव्हाण यांनी कामकाज बघितले पोलीस प्रॉसिक्युशन स्कॉड चे गजानन फरांदे, मंजूर मणेर, राजेंद्र कुंभार ,अश्विनी घोरपडे, अमित भरते यांनी परिश्रम घेतले.