पुणे हादरले : ACP ने पत्नी व पुतण्याची हत्या करून स्वत:लाही संपविले

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. २४ जुलै २०२३ | पुणे |
पुण्यातील एका मोठ्या पोलीस अधिकार्‍याने स्वत:ची पत्नी आणि पुतण्याची गोळी झाडून हत्या केली व त्याच पिस्तुलातून गोळी झाडून स्वत:लाही संपविले आहे. या घटनेने पुणे हादरले असून पोलीस दलात खळबळ उडाली आहे. भारत गायकवाड असे या पोलीस अधिकार्‍याचे नाव असून ते अमरावती पोलीस दलात सहाय्यक पोलीस आयुक्त आहेत.

पोलीस अधिकारी भारत गायकवाड यांनी पुणे शहरात असणार्‍या चतुश्रुंगी परिसरातील आपल्या घरात पत्नी मोनी आणि पुतण्या दीपक यांच्यावर गोळीबार करून त्यांची हत्या केली व त्याच पिस्तुलातून स्वत:वरही गोळी झाडून घेतली. आज पहाटे ४.०० वाजण्याच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडल्याचे समजते.

घटनेनंतर चतुश्रृंगी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. भारत गायकवाड हे अमरावती पोलीस दलात सहायक पोलीस आयुक्त पदावर कार्यरत होते. त्यांचे कुटुंबीय पुण्यात वास्तव्यास होते. या घटनेने पोलीस दलात खळबळ उडाली असून घटनेमागचे कारण अद्याप समजू शकले नाही.


Back to top button
Don`t copy text!