दैनिक स्थैर्य | दि. १८ ऑगस्ट २०२३ | सातारा |
पुणे विभागातील पुणे-सातारा रेल्वे मार्गावरील नीरा-लोणंद स्टेशनदरम्यान ट्रॅफिक ब्लॉक घेऊन वर्तमान डाऊन मेन रेल्वे मार्गाला नवीन तयार होत असलेल्या रेल्वे मार्गासोबत जोडण्याचे आणि इतर महत्त्वपूर्ण कामे केली जातील. यामुळे रविवार, दि. २० ऑगस्टला गाड़ी क्रमांक ११४२५ पुणे – कोल्हापूर डेमू एक्सप्रेस पुणेऐवजी सातारा येथून कोल्हापूरला सोडण्यात येईल. तसेच कोल्हापूर येथून पुणेसाठी सुटणारी गाडी क्रमांक ११४२६ कोल्हापूर- पुणे डेमू एक्सप्रेस या गाडीची यात्रा सातारा येथेच समाप्त होईल. म्हणजेच ही गाडी पुणे-सातारा-पुणेदरम्यान रद्द राहील.
शनिवार दि. १९ ऑगस्टला चंदीगडहून सुटणारी गाड़ी संख्या २२६८६ चंदीगड – यशवंतपूर एक्सप्रेस दौंड-कुर्डूवाडी-मिरज या बदललेल्या मार्गाने चालविण्यात येईल. अर्थात ही गाडी पुणे येथे येणार नाही.
शनिवार दि. १९ ऑगस्टला बंगळुरूहून सुटणारी गाड़ी क्रमांक १६५०६ बंगळुरू – गांधीधाम एक्सप्रेस गाडीला मिरज – लोणंद दरम्यान थोडा विलंब होईल, याची नोंद प्रवाशांनी घेण्याचे आवाहन रेल्वेकडून करण्यात आले आहे.