’गुंफण’ च्या बहारदार कवी संमेलनात रंगले पुणेकर


स्थैर्य, 21 फेब्रुवारी, सातारा : पुणे येथील कोथरुडच्या जे. पी. नाईक शिक्षण आणि विकास केंद्राच्या सभागृहात रविवार, दि. 15 रोजी झालेल्या गुंफण सद्भावना साहित्य संमेलनात पाचव्या सत्रात महाराष्ट्राच्या कानाकोपण्यातून आलेल्या कर्वांनी सादर केलेल्या उत्तमोत्तम बहारदार कवितांनी पुणेकर साहित्य रसिकांना तृप्त केले. कवी संमेलनाच्या अध्यक्षस्थानी मंगसुळी, वि. बेळगाव, कर्नाटक येथील ज्येष्ठ कवी आबासाहेब पाटील होते,

प्रारंभीच सातारा जिल्हातील मसूर येथील स्वाती बाजारे यांनी ’सांगा सांगा चर्म कोणता’ या कवितेमध्ये हिरव्यागार या परतीचा पर्म कोणता? नभी रेखिल्या इंद्रधनूचा धर्म कोणता असे प्रश्न उपस्थित सरत मानवतेला हाक दिली. त्यानंतर बाळाप्रसाद चव्हाणयांनी आपल्या ’वैरी पाऊस’ या कविलेमधून पावसामुळे आलेल्या महापुरात उडवलेला हाहाकार आणि त्यामुळे हतबल झालेला बळीराजा अत्यंत समर्थपणे रसिकांसमोर उभा केला, त्यानंतर भूपेंद्र आल्हाट या कवीने पाळणापर’ या आपल्या कवितेमधून विमकुल्या जीवाचे दुःख अधोरेखित करताना उपस्थितांना अंतर्मुख व्हायला भाग पाडले. यानंतर मोहन राठोड यांनी एक सुंदर गाजल पेश करताना कित्येक लोक हसले गे कविते तुझ्यामुळे, जाळ्यात लक्ष फसले कवितें गे तुझ्यामुळे या कश्चित्तेमुळेच मिळालेल्या प्रेयसीचे मुषित उघड केले.

सत्राची सुस्वारच संमेलनातील सर्वात वयोवृद्ध अशा 85 वर्षांच्या बावधन (पुणे) येथील आजी राधामावशी वाघमारे यांच्या ’अवयव दान करा’ या कवितेने झाली, अत्यंत प्रभाय शाली शब्दात वाघमारे आजींनी मानवाच्या प्रत्येक अवयवाचा दुसर्‍याला कसा उपयोग होतो आणि त्यासाठी लोकांनी देहदान करावे असा संदेश या कवितेतून दिला. डॉ. संजय बोरुडे यांनी यावेळी सट हसले गालात पाणी लागलं तळ्यात, त्याच्या नावाचं डोरलं जवा बांधीन गळ्यात हे गीत स्वदर केले. विशेष म्हणजे हे गीत एका चित्रपटासाठी वापरण्यात आले असून तो चित्रपटही
लवकरच प्रदर्शित होणारअसल्याचे कवी डॉ. बोरुडे यांनी सांगितले.

बेळगाव जिल्ह्यातील मंगसुळी पेथील शेतकरी असलेले कत्री संगेलनाचे अध्यक्ष आबासाहेब पाटील यांनी जगप्रसिद्ध लिओनार्दो द विंची या चित्रकाराने रेखाटलेल्या वित्रातील मोनालिसा या रूपगर्वितेशी संवाद साधत शेतकन्याच्या अवस्थेविषयी भाष्य केले. अत्यांत हृदयस्पर्शी अशा या कवितेचा शेवटही पाटील यांनी ’मोच उलपदेन तुझ्या हसण्याचं नूड असा करताना अवपल्या ग्रामीण प्रतिभेचा एक पैलू उघड केला. आबासाहेब पाटील चांनी आपल्या इसर्‍या अडगळ’ या बत्रितेमधूनही कविता आणि जती यांची आजचीअवस्था मांडताना रडीतून गेली कविता म्हणून तीन रुपये किलोने गेली अशा अत्यंत दाहक शब्दात भाष्य केले.

रत्यप्रभादेवी मोहिते पाटील विद्यालयाच्या दीपक हुडे, समृद्धी कुमकर, संध्या पत्यार व स्वरा माने चार विद्याथ्यांनी अनुक्रमे बालकवी, शांता शेळके, मंगेश पाडगावकर आणि ना. धो. महानोर यांच्या गाजलेल्या कविता अत्यंत ताकदीने आणि नजाकतीने पेश केल्या. या विद्यायांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. पुणे देथील कवी अ‍ॅड. हनुमंत शिंदे यांनी अत्यंत मोजक्या आणि भावस्पशों शब्दात केलेल्या सूत्रसंचालनाने कवी संमेलनाने बंगळी उंची गाठली. यावेळी प्रत्येक सहभागी अवींचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.


Back to top button
Don`t copy text!