पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना कोरोनाची लागण


स्थैर्य, पुणे, दि. ०५ : पुणे शहराचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. मुरलीधर मोहोळ यांनीच त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून यासंदर्भात माहिती दिली.

“थोडासा ताप आल्याने मी माझी कोव्हिड-19 टेस्ट केली असता, ती पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती स्थिर असून लवकरच बरा होऊन पुन्हा तुमच्या सेवेत असेल,” अशी माहिती स्वत: मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

कोरोनावर उपचार घेत असतानाच कामही सुरु ठेवणार असल्याचं मोहोळ म्हणाले.

उपचारादरम्यान सर्व यंत्रणांच्या संपर्कात राहून परिस्थितीचा आढावा घेत राहील, असं मोहोळ यांनी ट्वीटमधून सांगितलं.

मुरलीधर मोहोळ हे पुण्यातील भाजपचे नेते असून, सध्या पुण्याच्या महापौरपदावर कार्यरत आहेत.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!