स्थैर्य, पुणे, दि.२: येथे एका महिलेला फावड्याने पतीचा गळा कापून हत्या करण्याच्या आरोपात अटक करण्यात आली आहे. दोघांमध्ये अनेक महिन्यांपासून भांडणं सुरू होते. पतीला संशय होता की, महिलेचे अफेअर सुरू आहे. पोलिसांना संशय आहे की, यामध्ये महिलेच्या प्रेमीचाही समावेश असू शकतो. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
मंगळवारी सकाळी ममुरडी गावातल्या भैरवनाथ मंदिराजवळील घरातून मयूर गायकवाड (वय 28) या व्यक्तीच्या हत्येप्रकरणी त्याची पत्नी ऋतु गायकवाडला अटक करण्यात आली. दोघेही रूग्णालयात काम करत होते. वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनीष कल्याणकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मयूर आणि रितूचे दीड वर्षापूर्वी लग्न झाले होते आणि दोघांनाही मूलबाळ नव्हते. मयुरला संशय होता की, त्याच्या पत्नीचे कुणासोबत तरी अफेअर सुरू होते आणि ती रात्री त्याच्यासोबत फोनवर बोलायची.
पतीला झोपलेले पाहून महिलेने मृत्यूच्या खाईत लोटले
गेल्या काही महिन्यांपासून या गोष्टींवरुन दोघांमध्ये वाद सुरू होता. शेजाऱ्यांनीही दोघांना अनेकदा भांडताना पाहिले होते. सोमवारी रात्री दोघेही नाइट ड्यूटीवर होते आणि तिथे कोणत्यातरी गोष्टींवरुन त्यांचा वाद झाला. यानंतर मयूर रात्री घरी परतला आणि सकाळी त्याचा मृतदेह आढळला. पोलिसांच्या तपासात समोर आले आहे की, ऋतुने रात्री उशीरा घरी येऊन पतीला झोपलेले पाहिले तेव्हा फावड्याने त्याच्या गळ्यावर घाव घालत हत्या केली.
घटनेनंतर केली मॉर्निंग वॉकला
खून केल्यानंतर पत्नी मॉर्निंग वॉकला निघून गेली आणि घरी परतल्यावर तिनेच पोलिसांनी पतीच्या हत्येची माहिती दिली. मयूरचा भाऊ ओमकार गायकवाडने सांगितले की, ऋतु खूप रागीट स्वभावाची होती आणि छोट्या-छोट्या गोष्टींवर पतीवर हल्ला करायची. लग्नानंतरही तिचे दोन तीन पुरुषांसोबत संबंध होते. कसून चौकशी केल्यानंतर आरोपी महिलेने आपला गुन्हा कबूल केला आहे.