पुणे : प्रसिद्ध उद्योजक गौतम पाषाणकर बुधवारपासून बेपत्ता, सुसाईड नोट सापडल्याने खळबळ, नातेवाईकांची पोलिसात तक्रार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 

स्थैर्य, पुणे, दि.२३: पुण्यातील प्रसिद्ध उद्योजक
गौतम पाषाणकर हे बुधवारीपासून बेपत्ता आहेत. ऑटोमोबाईल क्षेत्रातील
प्रसिद्ध उद्योजक म्हणून ओळख असलेले गौतम पाषाणकर बुधवारी संध्याकााळी साडे
चार वाजल्यापासून बेपत्ता झाल्याची माहिती मिळत आहे. 64 वर्षीय गौतम
पाषाणकर हे मॉडेल कॉलनी येथून बेपत्ता झाले. यानंतर शिवाजीनगर पोलीस
ठाण्यात मिसिंगची तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीस तपास सुरू आहे.

पाषणकर
हे बुधवारी दुपारी लोणी काळभोर परिसरात कामानिमित्त बाहेर निघाले होते.
तिथून ते पानशेतला कामासाठी जात असल्याचे सांगून गेले. त्यानंतरपासून
त्यांचा संपर्क झालेला नाही. नातेवाई, कार चालक आणि ऑफिसमधल्या
कर्मचाऱ्यांनी देखील अनेक वेळा संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र संपर्क
झाला नसल्याने शोध घेण्यात आला. या प्रकरणी सध्या पोलिस स्टेशनला तक्रार
दाखल करण्यात आली आहे.

दरम्यान
गौतम पाषाणकर यांची सुसाईट नोड सापडल्याने खळबळ उडाली आहे. त्याने आपल्या
ड्रायव्हरकडे एक लिफाफा दिलेला होता. घरी गेल्यानंतर शंकर यांच्या पत्नीने
हा लिफाफा उघडून पाहिलाय. यावेळी त्यात सुसाईड नोट होती. काही दिवसांपासून
व्यवसायात मोठ्या प्रमाणात नुकसान झाला असल्याचे सुसाईड नोटमध्ये लिहिण्यात
आले आहे. नुकसानामुळेच पाषाणकर हे तणावात होते.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!