
दैनिक स्थैर्य । दि. १५ मार्च २०२२ । फलटण । काश्मीर फाईल्स हा चित्रपट लवकरात लवकर प्रसारित व्हावा. यासाठी फलटण तालुक्यातील समस्थ हिंदू संघटनेच्या वतीने वतीने नामवैभव सिटी प्राईडच्या व्यवस्थापनाला सविस्तर निवेदन देण्यात आलेले आहे.
काश्मीर फाइल्स हा काश्मीर मधील हिंदूंच्यावर झालेल्या अत्याचारावर आधारित सत्य परिस्थिती सांगणारा आणि ज्वलंत ऐतिहासिक चित्रपट आहे. हा इतिहास आजपर्यंत लपवला गेला आहे, या इतिहासाची माहिती सर्वसामान्य जनतेला व्हावी म्हणून हा चित्रपट सर्वांनी पाहणे आवश्यक आहे, यासाठी हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित करण्यासाठी फलटण तालुक्यातील सर्व हिंदू संघटना यांनी एकत्रित येऊन चित्रपट गृहाच्या व्यवस्थापनाला निवेदन दिलेले आहे.
काही समाजविघातक शक्ती आणि संघटना हा चित्रपट प्रदर्शित होऊ नये यासाठी प्रयत्न करत आहेत, या चित्रपटाला थिएटर उपलब्ध होऊ नये यासाठी दबाव निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, परंतु हा प्रयत्न हाणून पाडल्या शिवाय राहणार नाही. लवकरात लवकर हा चित्रपट आपल्या चित्रपटगृहात प्रदर्शित करावा, यासाठी थिएटर व्यवस्थापनास काही दिवसांची मुदत देण्यात आली आहे. या कालावधीमध्ये चित्रपटगृहात हा चित्रपट प्राईम टाइममध्ये प्रसारित झाला नाही.