लोकनियुक्त नगराध्यक्षांनी राजीनामा द्यावा : अशोक मोने

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा, दि. 11 : सातारा पालिकेत जी काळीमा फासणारी घटना घडली आहे. ती आपल्या उपस्थितीत घडली आहे. त्यांचे गांभीर्य ओळखून आपल्या कार्यपद्धतीवर तो काळा ठपका असून त्यातुन मुक्ती मिळवायची असेल तर आपण नैतिकता व नित्तीमत्तेला धरुन त्वरीत राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधी पक्ष नेते अशोक मोने यांनी पत्रकाद्वारे केली आहे.

त्यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, सातारा नगरपालिकेच्या इतिहासात अशी लाजीरवाणी काळीमा फासणारी घटना घडली असताना आपली अकार्यक्षमता दडविण्यासाठी आमच्या काळात विकासकामे झाली नाहीत. अशी आवयी उठवून नागरिकांना विचलित करु नका व इतरत्र विषयांतर करु नका. सातारा शहरात एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत असून कोणास किती टक्केवारी आणि कशा प्रमाणात दिली आहे. त्यामध्ये कोणा कोणाची नावे आहेत हे सातारकरांनी ऐकले आहे. त्यामुळे निराशेपोटी आपण मला माझ्या आघाडीस बदनाम करण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहात. जनता एकदा तुमच्या आवाहनाला भुललेली आहे. परत भुलणार नाही. उगच सुर्यावर थुंकण्याचा प्रयत्न करु नका. पुर्वी केंद्र व राज्य शासनाकडून त्रोटक स्वरुपात अनुदान येत होते. सध्या कोटय़ावधी रुपये जनतेच्या विकासासाठी येतात त्याचा दुरुपयोग कसा होतो हे सातारकर जनता चांगल्या प्रकारे पाहत आहे. आपल्या नाकाखाली आणि आपण उपस्थित असताना अधिकारी व कर्मचारी यांना भ्रष्टाचार प्रकरणी अटक झाली आहे. हा प्रकार घडल्यानंतर आपण लगेच प्रतिक्रिया देण्याऐवजी घटना घडल्यानंतर अनेक दिवसांनी जाग येवून आपण पत्रक काढून इतर लोकांच्या काळात व आघाडीत कामे पुर्ण झाली नाहीत असा ढिंढोरा वाजवित आहात.

आता तर पालिकेच्या विभागातून फाईल्स गायब होत आहेत. आपणास हा भ्रष्टाचार वाटत नसून शिष्टाचार वाटत असेल. आपल्या आघाडीकडेसुद्धा सातारकरांनी अनेक वर्षे सत्ता दिली होती व आहे. काय विकास झाला व कशा प्रकारे विकास होत आहे हे जनता जाणून आहे. भ्रष्टाचारामध्ये नक्कीच विकास झाला आहे हे मात्र खरे. लोकनियुक्त नगराध्यक्ष असून प्रशासनावर आपली पकड व वचक नसल्यामुळे अशी काळीमा फासणारी घटना घडली आहे. मी नगराध्यक्ष असताना नगरविकास आघाडीचे आमचे दैवत कै. आमदार अभयसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली सातारकर जनतेला केंद्र बिंदू मानून अनेक विकासकामे केली आहेत. हे साताकर जनतेला ज्ञात आहेत. सध्या विरोधी पक्षनेता म्हणून आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा पालिकेत चांगल्या प्रकारे व सक्षमपणे काम करत आहे. चांगल्या कामास सहकार्य करत आहे. सातारा पालिकेत जी काळीमा फासणारी घटना घडली आहे. ती आपल्या काळात व उपस्थितीत घडली आहे. त्यांचे गांभीर्य ओळखून आपल्या कार्यपद्धतीवर तो काळा ठपका असून त्यातुन मुक्ती मिळवायची असेल तर आपण नैतिकता व नित्तीमत्तेला धरुन त्वरीत राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!