जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांची एलईडी व्हॅनद्वारे गावोगावी प्रसिद्धी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २५ फेब्रुवारी २०२२ । सातारा । अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजातील लोकांना त्यांच्यासाठी शासन राबवित असलेल्या योजनांची माहिती व्हावी यासाठी शासन विविध माध्यमांचा वापर करुन प्रसिद्धी करीत आहे. याचाच भाग म्हणून जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने मोबाईल फिरत्या वाहनावरुन एलईडी व्हॅनच्या माध्यमातून सामाजिक न्याय विभागाकडील विविध योजनांची प्रसिद्धी सुरु आहे.

जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने अनुसूचित जाती उपयोजनेमधून सामाजिक न्याय विभागाकडील योजनांची प्रचार व प्रसिद्धी एलईडी व्हॅनद्वारे करण्यात येत आहे. यामध्ये गटई कामगारांना पत्र्यांचे स्टॉल, कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना, सैनिकी शाळेतील अनूसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता, अत्याचारास बळी पडलेल्या कुटुंबांना अर्थसहाय्य, आयटीआय विद्यार्थ्यांना विद्यावेतन, विद्यार्थ्यांसाठी निवासी शाळा, राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती, राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार, दिव्यांग विद्यार्थ्यांना शालांतपूर्व शिष्यवृत्ती, रमाई आवास योजना, मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती,  मुला-मुलीकरिता शासकीय वसतिगृह, निर्वाह भत्ता व विद्यावेतन, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, भारत सरकार शिष्यवृत्ती  योजना यासह सामाजिक न्याय विभागाकडील अनेक योजनांची एलईडी व्हॅनच्यामाध्यमातून जिल्ह्यातील विविध गावांमधून प्रसिद्धी करण्यात येत आहे. नागरिकांनी या योजनांची माहिती करुन घ्यावी.


Back to top button
Don`t copy text!