दैनिक स्थैर्य | दि. २४ जानेवारी २०२५ | फलटण |
पोलीस बॉईज असोसिएशन, महाराष्ट्र राज्य यांच्या नूतन वर्षाचे ‘२४ तास दिनदर्शिका २०२५’ प्रकाशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक फलटण ग्रामीण श्री. महाडिक, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सातारा शहर श्री. शहा यांच्या हस्ते झाले.
यावेळी पोलीस बॉईज असोसिएशनचे फलटण तालुकाध्यक्ष तुळशीदास बडवे, फलटण शहराध्यक्ष चैतन्य बडवे, फलटण शहर उपाध्यक्ष उदय पवार उपस्थित होते.
याप्रसंगी पोलीस निरीक्षक महाडिक यांनी पोलीस बॉईज असोसिएशन करत असलेल्या उपक्रमांबद्दल त्यांचे कौतुक केले व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.