श्रीकांत देशपांडे यांच्या अनोळखी संगीतकार पुस्तकाचे प्रकाशन


दैनिक स्थैर्य । 4 ऑगस्ट 2025 । फलटण । येथील संगीतप्रेमी, सिने अभ्यासक, श्रीकांत देशपांडे यांच्या अनोळखी संगीतकार (हिंदी चित्रपट सृष्टीतील फारसे माहीती नसलेले संगीतकार) या पुस्तकाचे चे प्रकाशन राजलक्ष्मी कलदर्शन हॉल (कोथरूड) येथे आयोजित करण्यात आले होते.

या पुस्तकाचे प्रकाशन जेष्ठ सिने समिक्षक व लेखिका सुलभ तेरणीकर यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात आकाशवाणीच्या निवेदिका, लेखिका श्रीमती प्रभा जोशी व संगीत प्रेमी किशोर गुर्जर यांनी दुर्लक्षित झालेल्या पण गुणी संगीतकारांना प्रसिध्दीस आणण्याचे काम श्रीकांत देशपांडे यांनी या पुस्तकाव्दारे केल्याचे त्यांनी सांगितले. श्रीकांत देशपांडे यांनी सिनेप्रेमींकडून मिळालेली स्फूर्ती व सहकार्य या बद्दल कृतज्ञता व्यक्त केली. सिने संगीताबद्दल पहिले लिखाण ’स्थैर्य’ व दै. ऐक्य’ मधून झाल्याचे यांनी नमूद केले. प्रसिद्ध निवेदिका मंजिरी धामणकर यांनी सूत्रसंचालन केले, तर सौ. देशपांडे यांनी आभार मानले. कार्यक्रमास संगीत प्रेमी तसेच अनेक फलटणकर उपस्थित होते.

पुणे – श्रीकांत देशपांडे यांच्या पुस्तकाचे प्रकाशन करताना सुलभा तेरणीकर. त्यावेळी श्रीमती प्रभा जोशी, किशोर गुर्जर व इतर.


Back to top button
Don`t copy text!