दैनिक स्थैर्य | दि. २५ ऑक्टोबर २०२१ | पुणे | सहकारी संस्थांमधील निवडणूक प्रक्रियां बद्दल मार्गदर्शन करणाऱ्या ‘सहकारी निवडणूक मार्गदर्शक ‘ या पुस्तकाचे प्रकाशन सोमवारी दुपारी दोन वाजता पुणे श्रमिक पत्रकार संघ सभागृहात झाले. या पुस्तकाचे लेखन सहकार क्षेत्रातील लेखक, लेखापरीक्षक बी एस .जाधव ( सातारा )यांनी केले आहे. भक्ती बुक्स (नागपूर )यांनी हे पुस्तक प्रकाशित केले असून जाधव यांचे हे पाचवे पुस्तक आहे.
या पुस्तकाचे प्रकाशन राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे सचिव यशवंत गिरी यांच्या हस्ते तसेच राज्याच्या सैनिक कल्याण विभागाचे निवृत्त उपसंचालक कर्नल आर आर जाधव ‘ भक्ती बुक्स् ‘ चे संचालक लक्ष्मीकांत जयपूरकर, एस.बी. पाटील, राजेंद्र जयपुरकर, लक्ष्मीकांत जयपुरकर यांच्या हस्ते झाले.
डॉ.करंजकर,राजेंद्र जाधव, डॉ. दीपक बीडकर उपस्थित होते.
यशवंत गिरी म्हणाले, ‘ हे पुस्तक सहकार क्षेत्रातील निवडणूक प्रक्रियेत उत्तम मार्गदर्शक आहे.एकाच ठिकाणी सर्व मार्गदर्शक गोष्टी एकत्र आल्या आहेत. सहकार क्षेत्राच्या प्रशिक्षणाचा हेतू त्यातून साध्य होतो. सहकार क्षेत्रातील शिक्षण, प्रशिक्षणाचे महत्व त्यातून अधोरेखित होते.
सूत्रसंचालन अमोल जाधव यांनी केले. प्रमोद जाधव यांनी आभार मानले.