‘अग्निदिव्य’ पुस्तकाचे सातारा ग्रंथमहोत्सवात  प्रकाशन; आशिष निनगूरकर यांचे लेखन


दैनिक स्थैर्य | दि. 09 जानेवारी 2024 | फलटण | सातारा येथील जिल्हा परिषदच्या पटांगणात भरलेल्या पुस्तक महोत्सवाला वाचकांचा उदंड प्रतिसाद मिळाला.या पुस्तक महोत्सवात  येथील आशिष निनगूरकर यांच्या चपराक प्रकाशित ‘अग्निदिव्य’ या पुस्तकाचे प्रकाशन प्रमुख पाहुणे साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य प्रदीप पाटील, सागर महाराज पवार, सुप्रसिद्ध साहित्यिक आणि वक्ते, प्राचार्य यशवंत पाटणे, पुस्तक सातारा महोत्सवाचे सयोजक आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाहक शि्रीष चिटणीस ,कथाकार राजेंद्र माने, साहित्य परिषदेच्या प्रमुख कार्यवाह विकास मेहेंदळे, लेखक जे . डी . पराडकर , आशिष निनगुरकर व चपराकचे संपादक घनश्याम पाटील , अरुण कमळापूरकर यांच्या हस्ते करण्यात आले.

एका स्त्रीचा स्वतःच्या आस्तित्वासाठी व स्वतःच्या मुलाला हक्क व न्याय मिळवून देण्यासाठी दिलेला हा लढा, एक संघर्ष म्हणजेच ‘अग्निदिव्य’ हे पुस्तक. हे पुस्तक वाचतांना एका स्त्रीचा लढा केवळ ‘अग्नितांडव’ न राहता तो ‘अग्निदिव्य’ कसा बनत गेला याची प्रचिती हेते. कारण पुस्तकाच्या या नावातच या पुस्तकाचा सर्व गाभा दडलेला आहे. एका मुलाची आंतरिक वेदना,एका महिलेचा आभाळाएवढा संघर्ष व समाजमन असे तीन टप्पे युवालेखक आशिष निनगुरकर यांच्या ‘अग्निदिव्य’ या चरित्रात्मक पुस्तकात आहेत.

‘अग्निदिव्य’ या पुस्तकाची दर्जेदार निर्मिती चपराक प्रकाशन ने केली आहे.एका महिलेचा संघर्ष,माहेर-सासर जबाबदारी,त्यातून वाढलेल्या अनेक गोष्टी या सर्व परिस्थितीतून एका स्त्रीला कशाप्रकारे सर्व गोष्टींमधून जावे लागते. सासर व माहेरची दोन्ही नाती कशी सांभाळावी लागतात.हे सर्व समजून घेण्याचा प्रयत्न या चरित्रातून दिसून येतो.रमाबाई कांबळे यांचा जीवनप्रवास अतिशय खडतर होता तसेच त्यांच्या वाटेत प्रत्येकवेळी काटेच आले आहेत.तरी त्यांनी आत्महत्या न करता,प्रत्येक संकटाला झुगारून  सर्व गोष्टींचा सामना केला.हार मानली नाही.

अभिषेक व त्यांच्या आईचा जीवनपट किती काळीज फाडून दुःख देणारा आहे,हे पुस्तक वाचल्यावरच तुम्हाला कळू शकेल. संतोष घोंगडे यांनी उत्तम असे मुखपृष्ठ साकारले आहे. एका संकटग्रस्त कुटुंबातील स्त्रीला संशयकल्लोळातून कोणत्या अग्निदिव्यातून जावं लागलं, हे सांगणारी ही वास्तव कथा. लागोपाठच्या संकटांनी तिच्या आयुष्याची परवड झाली. त्यातही ती खंबीरपणे उभी राहिली. संकटांशी दोन हात केले. आपल्या मुलासाठी संघर्ष केला. अनंत अडचणींवर मात केली. मुलाला अर्थार्जनासाठी सक्षम केलं. त्याच्या पायावर उभं केलं. एका आईचं कर्तव्य पार पाडलं. कुठलाही दोष नसताना, गैरसमजाच्या अग्निदिव्यातून जात तिनं एक महत्त्वाचा टप्पा गाठला. यात आपलं अस्तित्व, ओळख मात्र ती पार विसरून गेली. अजूनही तिची वाटचाल संपलेली नाही. अजूनही तिची वाटचाल सुरूच आहे.  तिच्या कष्ट-त्याग-समर्पणाचीच ही एक गाथा-गाथा अग्निदिव्याची.याच पुस्तकाचे प्रकाशन आज सातारा ग्रंथ महोत्सवात झाले.

चित्रपटसृष्टीत लेखक आशिष निनगूरकर यांनी स्वतःचा एक वेगळा ठसा उमटवला आहे. त्यांच्या लेखनात मोठी ताकद आहे . त्यांनी केलेले वर्णन डोळ्यासमोर उभे रहाते . आज सातारा पुस्तक महोत्सवात ‘अग्निदिव्य’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले , ही चपराकसाठी आनंदाची बाब आहे .या पुस्तकाचे मुखपृष्ठ संतोष घोंगडे यांनी साकारले आहे.प्रकाशनाच्या पहिल्याच दिवशी पुस्तकाला वाचकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाल्याने हे पुस्तक नक्कीच विक्रम करतील असे प्रकाशक घनश्याम पाटील यांनी सांगितले.


Back to top button
Don`t copy text!