
दैनिक स्थैर्य । दि. १८ डिसेंबर २०२२ । बारामती । “असे श्रद्धा ज्यांच्यावर त्यास दिसे श्रीनाथ जोगेश्वरी ” या वाक्या प्रमाणे श्रीनाथ दिनदर्शिका च्या माध्यमातून सर्व क्षेत्रातील आवश्यक व अचूक माहिती वाचकांना नागरिकांना अगाध श्रद्धा असल्याने सह्ज मिळेल व श्रीनाथ म्हस्कोबा व माता जोगेशवरी यांचे रोज दर्शन होऊन दिवसाची सुंदर सुरुवात होण्यास दिनदर्शिका दिशादर्शक होईल असे प्रतिपादन बारामती तालुका दूध उत्पादक संघाचे माजी उपाध्यक्ष प्रताप आबा पागळे यांनी केले.
जळोची येथे शनिवार दि. 17 डिसेम्बर रोजी श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान ट्रस्ट, माळी मळा, जळोची यांच्या वतीने 2023 श्रीनाथ म्हस्कोबा दिनदर्शिका चे प्रकाशन सोहळ्याप्रसंगी प्रताप पागळे बोलत होते.
या प्रसंगी अमोल पिसाळ, अक्षय शेरे, रविंद्र जमदाडे, अनील सावळेपाटील , डाॅ. संतोष शिंदे, संतोष जमदाडे, दादा दांगडे , धनंजय जमदाडे, पोपट जमदाडे, नारायण जमदाडे, नवनाथ जमदाडे आदी मान्यवर उपस्तित होते.
या प्रसंगी दिनदर्शिका काढण्यासाठी अथक परिश्रम केलेले मनोहर जमदाडे, निखिल होले, किरण फरांदे, सचिन जमदाडे, अनिल जमदाडे, संदिप कुदळे, विष्णू जमदाडे, आकाश जमदाडे, तेजस जमदाडे, आदित्य जमदाडे, महादेव नेवसे, सागर जमदाडे, सुशांत जमदाडे,दगडु जमदाडे,महेश जमदाडे, नितीन जमदाडे, पांडुरंग कुदळे, नामदेव जमदाडे आदींचा सन्मान करण्यात आले.
दिनदर्शिका च्या माध्यमातून देवस्थान च्या कार्याचा प्रचार व प्रसार व्हावा व व्यवसायिक,उद्योजक , डॉकटर आदींचे कार्य गरजू ग्राहक व नागरिका पर्यंत सह्ज पोहचावे म्हणून दिनदर्शिकाचे कार्य हाती घेतल्याचे कार्यक्रमाच्या प्रास्ताविक मध्ये प्रा. मनोहर जमदाडे यांनी सांगितले उपस्थितांचे आभार धनंजय जमदाडे यांनी केले व किरण फरांदे , निखिल होले, सचिन जमदाडे यांनी कार्यक्रमाचे यशस्वी साठी परिश्रम घेतले तर सूत्रसंचालन प्रा मनोहर जमदाडे यांनी केले.