‘गती निर्णयांची प्रगती महाराष्ट्राची’ पुस्तिकेचे प्रकाशन ; राज्य सरकारच्या १०० दिवसांतील वाटचालीचे सिंहावलोकन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०३ नोव्हेंबर २०२२ । मुंबई । राज्य सरकारला १०० दिवस पूर्ण झाल्याचे औचित्य साधून माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘गती निर्णयांची प्रगती महाराष्ट्राची’ या पुस्तिकेचे आज प्रकाशन करण्यात आले. मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते तसेच मंत्रीमंडळातील सदस्य मंत्री यांच्या उपस्थितीत प्रकाशन करण्यात आले.

या पुस्तिकेच्या माध्यमातून राज्य सरकारच्या १०० दिवसांतील वाटचालीचे सिंहावलोकन करण्यात आले आहे.

‘शंभर दिवस सेवेचे, समर्पणाचे, प्रामाणिकतेचे आणि वनचबद्धतेचे!’ अशी या पुस्तिकेची संकल्पना आहे. या पुस्तिकेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मनोगतासह शंभर दिवसांच्या वाटचालीत घेण्यात आलेल्या लोकाभिमुख आणि महत्वपूर्ण अशा निर्णयांची माहिती संकलित करण्यात आली आहे. त्यामध्ये जवळपास सर्वच विभागांच्या महत्वाच्या निर्णयांचा आणि अंमलबजावणीच्या टप्प्यातील माहितीचा समावेश आहे. प्रकाशन प्रसंगी राज्याचे मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या सचिव तथा महासंचालक जयश्री भोज यांच्यासह विविध विभागांचे सचिवस्तरीय अधिकारी आदी उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!