दैनिक स्थैर्य । दि. २२ जुलै २०२२ । बारामती । बारामती तालुका जय जवान आजी-माजी सैनिक संघटनेच्या कार्याच्या पुस्तकाचे प्रकाशन आमदार सुनील आण्णा शेळके, आमदार निलेश लंके, राष्ट्रवादी महिला पुणे शहर च्या उपाध्यक्षा स्वाती चिटणीस, बारामती तालुका अध्यक्ष संभाजी होळकर, बारामती बँकेचे अध्यक्ष सचिन सातव, अजित दादा युथ फॉउंडेशन चे अध्यक्ष सोमनाथ गायकवाड व इतर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले
देश सेवा केल्यानंतर सुद्धा माजी सैनिक मोठ्या संख्येने उत्कृष्ट काम करत समाजाची सेवा करत आहे हे भूषणवाह असल्याचे आमदार सुनील शेळके यांनी सांगितले.
कोरोनाच्या च्या काळामध्ये सुद्धा माजी सैनिकांनी अतिशय उत्कृष्ट कामगिरी बजावत नागरिकांना दिलासा देण्याचे काम व बंदोबस्ताचे काम पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून केलेले आहे हे कौतुकास्पद असल्याचे आमदार निलेश लंके यांनी काढले.
माजी सैनिकांनी समाज्यासाठी दिलेले योगदान पुस्तकरूपी मांडत असल्याचे जय जवान आजी माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष हणमंतराव निंबाळकर यांनी सांगितले.
अध्यक्ष – हनुमंत निंबाळकर व रमेश रणमोडे, चंद्रकांत जोरे, प्रकाश चौधरी, अनिल कायगुडे, शिवनिंगा माळी, मच्छिंद्र वनवे, अभय निंबाळकर, पोपट निकम, प्रसाद कुलकर्णी, राजीव सस्ते यांनी सदर पुस्तक प्रकाशन साठी विशेष योगदान दिले आहे.