दैनिक स्थैर्य । दि. २६ फेब्रुवारी २०२२ । फलटण । मराठा आरक्षण व इतर मराठा समाजाचा प्रलंबित प्रश्नासंदर्भात छत्रपती संभाजी महाराज हे राज्य सरकारने हे प्रश्न ताबडतोब सोडवून मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मुबंई येथे आझाद मैदानावर आज आमरण उपोषण करण्यासाठी बसणार आहेत. दरम्यान, या आमरण उपोषणाला पाठिंबा म्हणून आज मराठा क्रांती मोर्चा फलटणने फलटण येथील अधिकार गृहासमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण सुरू केले आहे.
दरम्यान, जगाला प्रेरित होऊन शिकवण दिली असे 58 मोर्चे काढले, त्यामधून मराठा समाजाला जगातून नावाजले गेले असताना राज्य सरकार व केंद्र सरकारच्या भांडणात जबाबदारी ढकळल्याने मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही. तसेच तरुणांच्या साठी सारथी च्या माध्यमातून आर्थिक मदत होत नाही,तसेच अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या अनेक गोष्टी लक्षात आणून देऊनही आर्थिक मदत केली जात नाही, या निषेधार्थ व आरक्षण मिळावे यासाठी छत्रपती संभाजी महाराज हे आज मुंबईत आझाद मैदानात आमरण उपोषण करीत आहेत, त्यांना पाठिंबा देत असून राज्य सरकारने लवकरात लवकर आरक्षण द्यावे अशी मागणी केली आहे.
यावेळी बोलताना अनेकांनी सांगितले की,मराठा समाजाला आरक्षण लवकर दिले नाही तर ठाकरे सरकारला समाजाच्या वतीने सरकारला धारेवर धरले जाईल असे सांगून गर्भित इशारा मराठा क्रांती मोर्चा फलटण ने राज्य सरकारला दिला आहे.दरम्यान यावेळी मराठा क्रांती मोर्चा फलटण च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज डॉ.बाबासाहेब आंबेडकर,महात्मा फुले,श्रीमंत मालोजीराजे (राजे साहेब)यांना अभिवादन केले व अधिकार गृहा समोर उपोषणाला सुरुवात केली आहे.