दैनिक स्थैर्य | दि. २३ डिसेंबर २०२४ | फलटण |
फलटण येथील ‘मॅग आणि माऊली फाउंडेशन’ संचलित जनसेवा वाचनालयाच्या माध्यमातून मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा आणि मुलांच्या प्रज्ञा-पंखांना विस्तीर्ण आकाश देण्यासाठी विविध वयोगटात वक्तृत्व स्पर्धा दिनांक ३, ४ आणि ५ जानेवारी २०२५ दरम्यान आयोजित केल्या आहेत.
या स्पर्धांचे सविस्तर वेळापत्रक, वेळ, ठिकाण, दि. १ जानेवारी २०२५ रोजी जाहीर केले जाणार आहे आणि विविध गटातील तीन विजेत्यांना पारितोषिक देऊन गौरवण्यात येणार आहे. तसेच सहभागी विद्यार्थांना प्रशस्तीपत्र दिले जाणार आहे. या कार्यक्रमाचे पारितोषिक प्रायोजक ‘मॅग फिनसर्व कंपनी’, फलटण हे आहेत.
नावनोंदणीची अंतिम तारीख ३० डिसेंबर २०२४ असून नावनोंदणीसाठी जनसेवा डायग्नोसिस सेंटर, मोबा. – ९५३२९२३३०६७ (३ री ते ५ वी गट मुले), सौ. गौरी आरेकर – ८८४९३२७८७५ (३ री ते ५ वी गट मुली), प्रणिती लोंढे – ७८७५४७६१०३ (६ वी ते ८ वी गट मुले-मुली), प्रो. नितीन नाळे – ९४०४२४७०७६ (९ वी ते १२ वी गट मुले), सौ. मनीषा घडिया – ७०२०४६७६८२ (९ वी ते १२ वी गट मुली) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जनसेवा वाचनालयाने केले आहे.