
दैनिक स्थैर्य । दि. ११ जून २०२२ । पंढरपूर । आषाढी वारी जवळ आली, प्रशासनाची बैठक झाली पण चंद्रभागा नदीवरील ऐतिहासिक असलेल्या दगडी पुलावरील खड्यांच काय करणार आहात असा सवाल उपस्थित करत महर्षी वाल्मिकी संघाकडून प्रशासनाचा जाहिर निषेध व्यक्त करण्यात आला.
आम्ही वारंवार या ऐतिहासिक असलेल्या पुलावरील पडलेल्या खड्यांबाबत आंदोलन करत आहोत पण सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष आहे. आषाढी यात्रा काळात जर या ठिकाणी काही दुर्घटना घडली तर याला फक्त आणि फक्त सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार असेल असं महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी म्हटले आहे.
पुलावरील खड्यांबाबत निषेध व्यक्त करत असताना आषाढी वारी संदर्भात जी बैठक बोलावली होती त्या बैठकीचा फोटो समोर घेऊन आंदोलन करण्यात आले कारण या बैठकीत या पुलावरील पडलेल्या खड्यांचा विषय घेतला नाही. यामुळे आम्ही प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी अश्या प्रकारे आंदोलन केले असं गणेश अंकुशराव यांनी म्हटले आहे.
आषाढी वारी संदर्भात पंढरपूर मध्ये आढावा बैठक घेण्यात आली पण स्थानिक सामाजिक संघटना, सामाजिक कार्यकर्ते, समाजसेवक यांना बोलवले नाही आणि पंढरपूर मधील समस्या जाणून घेतल्या नाही असही यावेळी गणेश अंकुशराव यांनी सांगितले.
ऐतिहासिक असलेल्या या पुलावरील पडलेल्या खड्यांबाबत महर्षी वाल्मिकी संघाकडून या खड्यात गुढीपाडव्याला गुढी उभा करण्यात आली, होळी पौर्णिमा कचरयाची होळी केली गेली, प्रशासनाला साडी चोळीचा आहेर भेट देण्यात आला अशी वेगवेगळी आंदोलने करण्यात आली पण प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केलय असही यावेळी गणेश अंकुशराव यांनी म्हटले आहे.
यावेळी समाजसेवक निलेश माने, सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास उपळकर, महादेव माने, सोनू माने, श्रावण अधटराव, राजू शेजवळ, शशिकांत कांबळे, आनंद कांबळे, सुहास कोळी, महेश टोमके, आपाशा कोळी, नाथा डवरी, अमोल नेहतराव, परमेश्वर घंटे, नाना कोरे, सुरज कांबळे, आदी उपस्थित होते.