जाहीर नोटीस


 

जाहिर नोटिस 

 तमाम लोकांना विशेषतः कसबे फलटण ता. फलटण, जि. सातारा व पंचक्रोशीतील सर्व लोकांना ह्या जाहीर नोटीसीने कळवीणेत येते की, 

कसबे फलटण ता. फलटण, जि. सातारा येथील जमीन मिळकती अनुक्रमे स.नं.१११/१ क्षेत्र २.५९.०० हे.आर. चौ.मी. आकार १५रु. ६१ पैसे व स.नं. १११/२ क्षेत्र 0.१६.00 आकार 0.९७ पैसे या दोन्ही मिळकतीमधील १हे.३६ आर एवढा हिस्सा या मिळकती 

१) श्री. ज्ञानेश्वर रामचंद्र भोसले २) श्री अनंत रामचंद्र भोसले ३) श्री. मेघश्याम रामचंद्र भोसले ४) श्री. विक्रमसिंह सतीश खताळ-पाटील ५) सौ. कविता सागर चव्हाण तर्फे कुलमुखत्यार श्री. श्री. विक्रमसिंह सतीश खताळ-पाटील ६) श्रीमती मंगला रामचंद्र भोसले यांच्या मालकी वहिवाटीच्या मिळकती असून त्या या जाहीर नोटिसीचा विषय आहेत. 

वर नमूद मिळकतीवर नमूद इसमांनी आमचे आशिलांना कायमस्वरूपी खरेदी देण्याचे मान्य व कबूल केले असून त्या दृष्टीने आमचे अशील व वर नमूद केलेले जमीन मालक यांच्यामध्ये खरेदी–विक्रीबाबत साधक बाधक चर्चा होवून सदर मिळकती या निर्वेध व निजोखमी तसेच कोणत्याही वादाचा विषय नाहीत असा विश्वास जमीन मालकांनी आमचे अशिलांना दिलेला आहे. 

सबब या जाहीर नोटिसीने कळविणेत येते की, वर नमूद केलेल्या जमीन मिळकती संबंधाने किंवा त्यातील कोणत्याही भागावर कोणाचेही काही हक्क, मालकी अधिकार, खरेदीपत्र, अदलाबदलपत्र, बक्षिसपत्र, गुहाणखत, भडेकरार, कुळहक्क, पोटगीपत्र, वंशपरंपरेने आलेले अधिकार, परवाना, तसेच कोर्टाचा हुकूमनामा, ताकीद, गहाण, जप्ती, आदेश, संपादन, वाहिवाटीचे हक्क व अन्य कोणत्याही प्रकारे हक्क निर्माण झाले असतील तर त्या त्या संबंधीत इसमांनी प्रस्तुतची जाहीर नोटीस जाहीर झालेपासून १५ दिवसांचे आत सर्व त्या कागदपत्रांसोबत वर नमूद पत्यावर समक्ष हजर होवून त्यांचे सदर मिळकतीतील असलेल्या अधिकाराबाबत पुराव्यासह खात्री करून द्यावी. जर दिले मुदतीत कोणिही वर नमूद केलेल्या मिळकतीबाबत कसल्याही हरकती घेतल्या नाहीत तर आमचे अशिल वर नमूद केलेल्या मिळकती ह्या निर्वेध , निजोखमी तसेच सर्व त्या भरापासून मुक्त असलेचे तसेच यदाकदाचित कोणाचे काही हक्क असलेस त्यांनी ते कायमस्वरूपी सोडून दिलेचे समजून आमचे अशिल वर नमूद केलेल्या इसमांशी खुषखरेदीचा व्यवहार पूर्ण करतील. मग त्याबाबत कोणाचीही कसलीही तक्रार चालणार नाही याची नोंद घ्यावी. 

सर्वांना विदीत व्हावे म्हणून हि जाहीर नोटीस. 

अशिलातर्फे ॲडव्होकेट 

– ॲड. नितीन नामदेव जाधव

बी.ए.(ऑनर्स), एल.एल.एम 

ॲडव्होकेट व नोटरी – भारत सरकार 

रा. “निस्वार्थ”, स.नं.६६/१, प्लॉट नं. ७८ 

राजलक्ष्मी मंगल कार्यालया शेजारी 

भडकमकर नगर, ता.फलटण , जि.सातारा 

मो: ९४२२४०४६३९ / ७७६८८८८८०१


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!