
स्थैर्य, सातारा, दि. 18 डिसेंबर : विद्रोही सांस्कृतिक चळवळ, महाराष्ट्र यांच्या वतीने मंगळवार दि.23 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता जाहीर व्याख्यानाचे आयोजन हे सातार्यात करण्यात आलेले आहे. चौदावे विद्रोही साहित्य संस्कृती संमेलनाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर ’यांच्या अध्यक्षतेखाली हा व्याख्यान कार्यक्रम पार पडणार आहे.
प्रमुख वक्ते म्हणून जेष्ठ विचारवंत लेखक व पत्रकार निरंजन टकले हे घालमोड्या दादांचे साहित्य संमेलन व आमची भूमिका या विषयांवर विशेष संवाद साधणार आहेत. याप्रसंगी डॉ. बाबुराव गुरव, अॅड. सुभाष (बापू) पाटील, ह.भ.प.डॉ. सुहास फडतरे महाराज, कॉ. धनाजी गुरव, कॉ. डॉ. जालिंदर घिगे आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहेत. हा व्याख्यान कार्यक्रम दैवज्ञ सांस्कृतिक भवन, यादोगोपाळ पेठ, सातारा येथे संपन्न होणार असून कार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्र शिव, शाहू, फुले, आंबेडकर विचारांचे पक्ष, संघटना, पुरोगामी पक्ष, संघटना, साहित्यिक, कलाकार आदींच्या वतीने करण्यात आलेले आहे.

