दैनिक स्थैर्य । दि. २० जून २०२२ । सातारा ।महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगामार्फत पुणे येथे ३० जुन २०२२ रोजी सुनावणी आयोजित करण्यात आली आहे. आयोगाकडे प्राप्त झालेल्या निवेदनाच्या अनुषंगाने ही सुनावणी घेण्यात येणार असल्याचे आयोगाचे संशोधन अधिकारी मेघराज भाते यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
पुणे विभागाची सुनावणी ३० जुन रोजी व्हि.व्हि.आय.पी. शासकीय विश्रामगृह, पुणे येथे दुपारी २ वाजेपासून होणार आहे. सुनावणीस सगर, कडिया, कुलवाडी, टकारी, लिंगायत रड्डी जाती तसेच जमाती उपस्थित राहणार आहेत.