कोरोना भिती दूर करण्यासाठी जनप्रबोधन आवश्यक- मत्स्यव्यवसायमंत्री अस्लम शेख

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, मुंबई, दि. 07 : करोना आजाराबाबत सामान्य जनतेच्या मनात प्रचंड भिती आहे. ही भिती दुर करण्यासाठी जिल्हा प्रशासकीय यंत्रणेने केलेल्या उपाययोजनांची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा तसेच जनतेचे प्रबोधन करा अशा सुचना मत्स्यव्यवसायमंत्री  अस्लम शेख यांनी दिल्या.

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. करोनाच्या अनुषंगाने प्रशासकीय पातळीवरून सुरू असलेल्या उपाय योजनांचा आढावा त्यांनी आज घेतला. या बैठकीस जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, भिवंडी मनपा आयुक्त  प्रविण आष्टीकर, निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील यांसह मनपा व अन्य विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

शेख यांनी  जिल्ह्यातील कोरोनाची सद्य संपूर्ण स्थिती व त्यांवर सुरू असलेल्या उपाययोजनांची माहिती घेतली. कोणत्याही परिस्थितीत उपचाराबाबत हलगर्जीपणा होणार नाही याकडे लक्ष देण्याच्या सुचना  त्यांनी केल्या. 

करोना आजाराबाबत सामान्य जनतेच्या मनात प्रचंड भिती असली तरी घाबरण्याचे कारण नाही. परंतु, आवश्यक काळजी घेण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील उपलब्ध बेडची संख्या डँशबोर्डच्या माध्यमातून सर्व जनतेला उपलब्ध करुन द्या. आपत्ती व्यवस्थापन केंद्राकडे प्राप्त तक्रारीचे निराकरण करुन नागरिकांना दिलासा देण्याबरोबरच त्यांचे मनोधैर्य वाढविण्यावर भर देण्यात यावा असे ही त्यांनी सांगितले. करोनासारख्या जीवघेण्या आजाराला परतवून लावण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याची गरज आहे. सोशल मीडियातून चांगल्या बाबींची माहिती लोकांना द्या असेही  ते म्हणाले.

एखादी व्यक्ति परदेशातून आल्यानंतर त्यासाठी आयसोलेशन व कोरेनटाईन कक्ष तयार ठेवा. नव्याने ऊभारण्यात येणाऱ्या रुग्णालयांमध्ये आवश्यक त्या सुविधा करण्यावर भर देण्यात यावा अशा सुचना श्री शेख यांनी केल्या.

जिल्हाधिकारी नार्वेकर यांनी जिल्ह्यातील कोरोनाच्या संबंधित सर्व  उपाययोजनांची माहिती दिली.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!