
दैनिक स्थैर्य । 21 ।जुलै 2025 । फलटण । येथील अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या येथील शाखेच्यावतीने शनिवारी 27 जुलै रोजी सायंकाळी 5.00 वाजता महात्मा फुले चौकात ‘साप वाचवा’ तसेच ‘चायनीज मांजापासून पक्षी वाचवा’ या उपक्रमाची जनजागृती करण्यात येणार आहे. तसेच शहरातील विविध शाळांना भेट देऊन विद्यार्थ्यांना याविषयीची माहिती देण्यात येणार आहे.
अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या आयोजित बैठकीमध्ये चायनीज माज्यांमध्ये अडकल्याने विविध पक्षांचा मृत्यू होतो, याविषयी प्रबोधन करण्यासाठी शहरातील विविध शिक्षण संस्थाचे संस्थापक याविषयी निवेदन देण्यात येणार आहे. अंध श्रद्धा निर्मूलन समितीचे आनंद देशमुख प्रशांत पोद्दार, धुमाळ सर तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.