भारतात PUBG चे कमबॅक : साउथ कोरियन कंपनी 100 मिलियन डॉलरची गुंतवणूक करणार, चीनसोबत पार्टनरशिप होणार नाही


 

स्थैर्य, नवी दिल्ली, दि.१२: लोकप्रिय PUBG मोबाइल गेम एका
नव्या अवतारात भारतात परतणार आहे. साउथ कोरियन कंपनी PUBG कॉर्पोरेशनने
गुरुवारी याबाबत घोषणा केली. कंपनीने म्हटले की, हा नवीन गेम फक्त भारतातील
यूजर्ससाठी असेल. या वेळेस चीनी कंपनीसोबत कोणत्याही प्रकारची पार्टनरशिप
होणार नाही.

PUBG
कॉर्पोरेशनची पॅरेंट कंपनी Krafton Inc ने भारतात 100 मिलियन डॉलरची
गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने दावा केला आहे की, ही गुंतवणूक
भारतातील इतर कोणत्याही कोरियन कंपनीपेक्षा सर्वात मोठी आहे. केंद्र
सरकारने सायबर सिक्योरिटी आणि देशाच्या सार्वभौमत्वावर धोका असल्याचे म्हणत
पबजी गेमवर बंदी आणली होती.

लॉन्चिंगची तारीख अद्याप ठरली नाही

कंपनीने
म्हटले की, PUBG भारतात PUBG Mobile India लॉन्च करेल. परंतू, कंपनीने
अद्याप गेम लॉन्चिंगची तारीख सांगितली नाही. परंतू, या गेमबाबची माहिती
लवकर शेअर केली जाईल. यासोबतच कंपनीने भारतीय यूजर्सला सिक्योर आणि हेल्दी
गेम प्लेचे ऑप्शन देण्याचा दावाही केला आहे. यासोबतच, लोकल वीडियो गेम्स,
ई-स्पोर्ट्स एंटरटेनमेंट आणि IT इंडस्ट्रीजमध्ये गुंतवणूक केली जाईल.
भारतात 100 पेक्षा जास्त कर्णचाऱ्यांना नोकरी दिली जाईल, यासाठी लोकल
ऑफिसदेखील तयार केले जाईल, असेही कंपनीकडून सांगण्यात आले आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!