डाक विभागातील कोरोना बाध‍ितांना राज्यपालांकडून एक लाख रुपयांची मदत प्रदान

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, मुंबई, दि. 23 : डाक विभागातील कोरोना बाध‍ित कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी  राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज एक लाख रुपयांचे वैयक्तिक योगदान दिले. राज्याचे मुख्य पोस्ट मास्तर जनरल हर‍िशचंद अग्रवाल यांनी आज राजभवन येथे राज्यपालांकडून एक लाख रुपये रकमेचा धनादेश स्वीकारला. यावेळी सहाय्यक पोस्ट मास्तर जनरल श्रीनिवास व्यवहारे हे देखील उपस्थित होते.

डाक विभागातर्फे नोव्हेंबर महिन्यात आयोजित केलेल्या राज्यस्तरीय पत्रलेखन स्पर्धेत राज्यपाल श्री. कोश्यारी यांना प्रथम क्रमाकांचे २५ हजार रुपयांचे पारितोषिक प्राप्त झाले होते.  या रकमेत स्वत:चे ७५ हजार रुपये जोडून ही रक्कम राज्यपालांनी डाक विभागातील कोरोना बाध‍ित कर्मचाऱ्यांसाठी महाराष्ट्र पोस्टल सर्कल वेलफेअर फंडाला दिली.

महात्मा गांधी यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त डाक विभागाच्या महाराष्ट्र व गोवा परिमंडळाने “ढाई आखर” पत्रलेखन स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत “प्रिय बापू अमर है” या व‍िषयावर आंतरदेशीय पत्र प्रवर्गात केलेल्या निबंध लेखनासाठी राज्यपालांना प्रथम क्रमाकाचे पारितोषिक प्राप्त झाले होते.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!