फलटण – पंढरपूर रेल्वेसाठी निधीची तरदूत करा; खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची मागणी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.०३ फेब्रुवारी २०२२ । फलटण । पंढरपूर हे महाराष्ट्रातील जगप्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. देशभरातून आणि प्रामुख्याने महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या राज्यांतून लाखो भाविक वर्षभर येथे भेट देतात. फलटण ते पंढरपूर हा नवीन रेल्वे मार्ग तयार झाल्याने एकीकडे देशभरातून पंढरपूरला जाणाऱ्या प्रवाशांची मोठी सोय होणार आहे, तर दुसरीकडे या भागाच्या आर्थिक विकासाबरोबरच रोजगाराच्याही नव्या संधी उपलब्ध होणार आहेत, त्यामुळे फलटण ते पंढरपूर ह्या रखडलेल्या रेल्वे मार्गासाठी भरीव निधीची तरतूद करावी अशी मागणी माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केलेली आहे.

सध्या संसदेचे बजेटचे अधिवेशन सुरु आहे. त्यामध्ये माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सदरील लेखी मागणी केंद्र सरकारकडे केलेली आहे.

फलटण ते पंढरपूर रेल्वेमुळे सोलापूर जिल्ह्यातील बेरोजगार तरुणांना विविध माध्यमातून रोजगार उपलब्ध होईल. फलटण ते पंढरपूर हा नवीन रेल्वे मार्गाचा प्रस्ताव हा जवळपास 100 वर्षे जुना आहे. या मार्गासाठी भूसंपादनाचे कामही पूर्ण झाले आहे. पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी सन 2017-18 मध्ये 1400 कोटी रुपये खर्चून फलटण ते पंढरपूर हा नवीन रेल्वे मार्ग (108 किमी) बांधण्यास तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिली होती. फलटण ते पंढरपूर या रेल्वे मार्गाचे बांधकाम लवकरात लवकर सुरू करावे आणि या सन 2022-2022 या अर्थसंकल्पीय वर्षात मार्गाचे बांधकाम वेळेत पूर्ण होण्यासाठी आवश्यक आर्थिक तरतूद करावी, अशी मागणी माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केलेली आहे.


Back to top button
Don`t copy text!