स्थैर्य, फलटण, दि. २० : सध्या फलटण शहरासह तालुक्यामध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या हि झपाट्याने वाढत आहे. आगामी काळामध्ये फलटण मध्ये कोरोनाचे रुग्ण वाढणार असल्याची श्यक्यता सर्वत्र वर्तवली जात आहे. तरी फलटण तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांना सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात असे निर्देश माढा लोकसभा मतदार संघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांना दिले.
फलटण तालुक्यातील कोरोना रोगाचा आढावा घेण्यासाठी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आलेली होती. या वेळी सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, प्रांताधिकारी डॉ. शिवाजी जगताप, पोलीस उपअधीक्षक तानाजी बरडे, तहसीलदार समीर यादव, मुख्याधिकारी प्रसाद काटकर, गटविकास अधिकारी सौ. अमिता गावडे – पवार यांची उपस्थिती होती.