नागरिकांना उत्तम सोयी व सुविधा द्या; खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे महावितरणला आदेश

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, कोळकी, दि. ३० : कोळकीमधील जाधववस्ती, शिंदे वस्ती व वनदेवशेअरी भागामध्ये लाईटचा प्रश्न मोठ्या प्रमाणात उपस्थित राहिला होता. तेथील नागरिकांनी महावितरणच्या कार्यालयात वारंवार हेलपाटे मारून सुध्दा तेथील लाईटचा प्रश्न सुटत नव्हता. भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे यांनी सदर गोष्ट खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी त्वरित महावितरणच्या जेष्ठ अधिकार्यांशी साधून कोळकी येथील लाईटची समस्या तातडीने सोडवण्याचे आदेश दिले व त्या नंतर लगेचच कोळकी येथील जाधववस्ती येथे २०० केव्हीचा नवीन डीपी मंजुर करून बसविण्यात आलेला आहे.

कोळकी येथील जाधववस्ती येथे डीपी बसवल्यानंतर जयकुमार शिंदे, रणजित जाधव, गोरख जाधव, सचिन शिंदे व देवीदास जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.


Back to top button
Don`t copy text!