अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना हेक्टरी 50 हजार अनुदान द्या

काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेंद्र सूर्यवंशी यांची मंत्री मकरंद पाटील यांना निवेदनाद्वारे मागणी


दैनिक स्थैर्य । 1 जून 2025। फलटण । फलटण तालुक्यात अवकाळी पावसाने शेतकर्‍यांच्या शेत जमिनीचे खूप नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना तातडीने हेक्टरी 50,000/- रुपये अर्थिक मदत मिळावी तसेच पावसामुळे नागरिकांच्या घराचेही नुकसान झालेले आहे. त्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या वार्षिक अनुदानाच्या 10% पर्यंत निधी वापर करून राज्य शासनाच्या वतीने मदत मिळावी, अशी मागणी राष्ट्रीय काँग्रेसचे फलटण तालुकाध्यक्ष महेंद्र बेडके (सूर्यवंशी) यांनी मदत व पुनवर्सनमंत्री ना. मकरंद पाटील यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

मंत्री मकरंद पाटील यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अतिवृष्टीमुळे शेतातील माती, दगड वाहून गेल्याने नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना पुन्हा शेतजमीन तयार करण्यासाठी तलावातील, धरणातील तसेच इतर क्षेत्रातील गाळ, माती व दगड मोफत उपलब्ध करून देण्यात यावी.

तसेच रहिवासी क्षेत्रातील अनेक घरांची मोठ्याप्रमाणात पडझड झालेली आहेत त्यांना पक्के बांधकाम करण्यासाठी भरीव अर्थिक मदत मिळावी.

कृषी खात्यामार्फत शेतकर्‍यांना बी बियाणे मोफत वाटप करण्यात यावे व पीक अनुदान मिळावे. सार्वजनिक बांधकाम व ग्रामविकास तसेच नगरविकास विभागामार्फत शहर हद्दीतील तातडीने वाहून गेलेले रस्ते, पूल,साकव दुरुस्ती तसेच पुनर्निर्माण करण्यात यावे यासाठी स्वतंत्र निधीची तरतूद करण्यात यावी, अशा मागण्यांचा समावेश निवेदनात केला आहे.


Back to top button
Don`t copy text!