राष्ट्रीय पर्यटन पुरस्कारात महाराष्ट्राची कामगिरी अभिमानास्पद – पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा


दैनिक स्थैर्य । दि. २८ सप्टेंबर २०२२ । मुंबई । राष्ट्रीय पर्यटन पुरस्कारात महाराष्ट्राने मारलेली बाजी अतिशय अभिमानाची आहे. महाराष्ट्रात पर्यटनासाठी अनेक ठिकाणे आहेत. जुन्या पर्यटन स्थळाबरोबरच नवीन स्थळांचा ही विकास केला जाणार आहे, अशी प्रतिक्रिया पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी व्यक्त केली.

त्यांनी सांगितले की, महाराष्ट्राला मिळालेले यश अतिशय कौतुकास्पद आहे. या पुरस्काराने राज्यातील पर्यटनाच्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या सर्वांना प्रेरणा मिळणार आहे. पर्यटनाच्या क्षेत्रातील सर्व घटकांना एकत्र घेऊन राज्याचा पर्यटन विकासासाठी शासनाच्या वतीने प्रयत्न केले जातील.

पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती, शाश्वत आणि पर्यावरण पूरक पर्यटनास चालना देण्यासाठी विशेष कृती आराखडा आखण्यात येत आहे, असेही त्यांनी सांगितले.


Back to top button
Don`t copy text!