भाजपाच्या 12 आमदारांचे निलंबन केल्याच्या निषेधार्थ सातार्‍यात निदर्शने

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. ७ जुलै २०२१ । सातारा । विधानसभेत गदारोळ झाल्यानंतर महाआघाडी सरकारने भाजपाच्या 12 आमदारांचे एक वर्षभरासाठी निलंबन केले. त्याच्या निषेधार्थ सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निर्दशने करण्यात आली व निवेदन देण्यात आले. त्याची प्रत राज्यपाल महोदय, मुख्यमंत्री महोदय यांना पाठवण्यात आली.

यावेळी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष सौ. सुवर्णाताई पाटील, सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी, सातारा तालुका अध्यक्ष राजेंद्र इंगळे, जिल्हा सरचिटणीस विठ्ठल, बलशेटवार, जिल्हा उपाध्यक्ष राहुल शिवनामे, अ‍ॅड. प्रशांत खामकर, महिला मोर्चा जिल्हा सरचिटणीस सौ. मनीषाताई पांडे, वैद्यकीय आघाडीचे अध्यक्ष डॉक्टर रेपाळ,व्यापारी आघाडी अध्यक्ष डॉक्टर सचिन साळुंखे, सरचिटणीस मनीष महाडवाले,भटके विमुक्त आघाडी प्रदेश सदस्य सौ प्रिया नाईक ,नगरसेविका सौ प्राची ताई शहाणे, शहर सरचिटणीस प्रवीण शहाणे, तालुका सरचिटणीस गणेश पालखे, शहर उपाध्यक्ष चंदन घोडके, प्रशांत जोशी, महिला मोर्चा शहरअध्यक्ष सौ रीना भणगे, ओ बी सी मोर्च्या जिल्हाध्यक्ष सुनील शिंदे, सिने कलाकार आघाडी जिल्हाध्यक्ष विकास बनकर, सतारा शहर चिटणीस रवींद्र आपटे, महिला मोर्चा शहर उपाध्यक्ष, नेहा खैर, सरला घोडके, युवा मोर्चा सातारा शहर अध्यक्ष विक्रम बोराटे, सोशल मीडिया शहर अध्यक्ष कृणाल मोरे, युवती आघाडी सातारा शहराध्यक्ष दीपिका झाड, सातारा तालुका चिटणीस सुनील जाधव, उद्योजक आघाडी जिल्हा सरचिटणीस दीपक क्षीरसागर, उद्योजक आघाडी जिल्हा उपाध्यक्ष अमोल टंकसाळे, सातारा शहर चिटणीस, संतोष प्रभूणे, महिला मोर्चा शहर सरचिटणीस हेमांगी जोशी, वैशाली पंडित, ओ. बी. सी. मोर्चा जिल्हा सरचिटणीस, सौ. वनिता पवार, ओ बी सी मोर्चा तालुका अध्यक्ष विक्रम पवार, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष तेजस काकडे ओ बी सी मोर्चा जिल्हा सरचिटणीस राहुल चौगुले, प्रवीण आढाव, सुरेखा धोत्रे, मनीषा जाधव, पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

विधानसभा अधिवेशनात, गोंधळाचे खोटे निमित्त करून, ठाकरे सरकारने भाजपच्या 12 आमदारांना एक वर्षांसाठी निलंबित केले. हा लोकशाही चा खून आहे. ठाकरे सरकारने लोकशाही मूल्यांना पायदळी तुडवायचे धोरण सातत्याने अवलंबले आहे. याचीच परिणीती म्हणजे कालचे 12 आमदारांचे निलंबन असल्याची टिका यावेळी पदाधिकार्‍यांनी करत लोकशाहीचा मुडदा पडणार्‍या ठाकरे सरकारचा निषेध करत असल्याच्या घोषणा दिल्या.


Back to top button
Don`t copy text!