स्थैर्य, फलटण : NRC व CAA विरोधी देशव्यापी आंदोलनात सहभागी झालेले आंदोलनकांची सुटका करावी अशी मागणी, फलटण तालुका मुस्लिम जमातच्या वतीने प्रभारी तहसीलदार आर. सी. पाटील यांच्या कडे सविस्तर निवेदनाद्वारे करण्यात आलेली आहे.
डॉ.कफील खान साहेब व विविध ठिकाणच्या आंदोलनकर्त्यांवर ज्या खोट्या केसेस दाखल करून संविधानाने दिलेल्या लोकशाहीला संपविण्याच्या दृष्टीने केल्या गेलेल्या केंद्र सरकारच्या मनमानी विरोधात, या सर्व कार्यकर्त्यांच्या सुटकेसाठी शांतता, सुव्यवस्था आणि सामाजिक अंतराचे भान ठेऊन या राष्ट्रव्यापी आंदोलनांतर्गत सातारा येथे जिल्हाधिकारी व फलटण येथे तालुका स्तरावर प्रभारी तहसीलदार यांना फलटण तालुका मुस्लिम समाज, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा तसेच बहुजन क्रांती मोर्चा या सर्व संघटनेच्या संयुक्त विद्यमाने फलटणचे प्रभारी तहसीलदार आर. सी. पाटील यांना निवेदन देण्यात आले.
हे आंदोलन राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने भारतातील 550 जिल्ह्यातील व 4500 तालुक्यात केले गेले आहे. या वेळी बादशाही मस्जिद ट्रस्टचे अध्यक्ष सलीमभाई शेख, हाजी निजाजभाई आतार, अमीर शेख, पप्पू शेख, मेहबूबभाई मेटकरी, रियाजभाई इनामदार, हाजी सदिकभाई बागवान, रहिम तांबोळी, जमशेद पठाण, आबिद खान, रियाज बागवान, सैफुल्ला शेख, सिकंदर डांगे, मुनिर तांबोळी, अजीज शेख, जावेद शेख यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.