दैनिक स्थैर्य । दि. २८ एप्रिल २०२३ । बारसू । रिफायनरी विरोधात बारसूमध्ये सुरु असलेले आंदोलन आता तीन दिवसांसाठी स्थगित करण्यात आले आहे. स्थानिक नेत्यांनी याची घोषणा केली आहे. याचबरोबर जर तीन दिवसांत माती परीक्षण थांबले नाही तर पुन्हा आंदोलन पुकारण्याची घोषणा करण्यात आली आहे.
बारसूमध्ये कोणावरही लाठीचार्ज केलेला नाही, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. काही स्थानिक तर काही बाहेरून आलेले लोक आहेत, असेही ते म्हणाले. या दरम्यान बारसूमध्ये आंदोलकांशी बोलण्यासाठी रत्नागिरीचे जिल्हाधिकारी आले होते. त्यांनी आंदोलकांना चर्चेसाठी येण्याचे आवाहन केले. परंतू, जिल्हाधिकाऱ्यांकडून ठोस काही घोषणा होत नसल्याने आंदोलक त्यांच्यासमोरून निघून गेले. राजापूरमध्ये देखील दोन तास संवाद साधला होता. प्रशासन तुमच्या सोबत आहे, समस्यांवर मार्ग निघू शकतील. प्रतिनिधींचे नावे द्या, आम्ही त्यांच्यासोबत संवाद साधू असे सांगत जिल्हाधिकाऱ्यांनी बोलणे थांबविले.