श्री दत्त इंडिया साखरवाडी कारखान्याच्या सेवानिवृत्त कामगारांचे धरणे आंदोलन


दैनिक स्थैर्य | दि. ११ ऑगस्ट २०२४ | फलटण |
श्री दत्त इंडिया प्रा. लि. साखरवाडी या साखर कारखान्याच्या सेवानिवृत्त कामगार यांनी त्यांच्या भविष्य निर्वाह निधीची रक्कम त्वरीत मिळावी यासाठी कारखान्याच्या गेटसमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे.

श्री दत्त इंडिया कारखाना व्यवस्थापनाबरोबर सेवानिवृत्त कामगारांची अनेकवेळा चर्चा झाली आहे. त्यावेळेस कामगारांच्या सर्व देय रकमा तसेच भविष्य निर्वाह निधीची रक्कम देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. परंतु कामगारांच्या हक्काचा भविष्य निर्वाह निधी देण्याकडे कारखाना व्यवस्थापन जाणूनबुजून दुर्लक्ष करीत आहे, असा आरोप सेवानिवृत्त कामगारांनी केला आहे.


Back to top button
Don`t copy text!