शिवाजी संग्रहालयाच्या इमारत परिसरातील चार्जिंग स्टेशनला विरोध

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १६ सप्टेंबर २०२२ । सातारा । छत्रपती शिवाजी संग्रहालयाच्या जागेत ई बस साठी चार्जिंग स्टेशन उभारण्यास शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आज जोरदार विरोध करत तीव्र निदर्शने केली एसटी महामंडळ व जिल्हा प्रशासनाचा यावेळी निषेध नोंदवण्यात आला हे चार्जिंग स्टेशन महामंडळाच्या जागीच करावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे या आंदोलनामध्ये शिवसेना सातारा शहर प्रमुख बाळासाहेब शिंदे गणेश अहिवळे प्रणव सावंत सागर धोत्रे सादिक भगवान यांनी सहभाग घेतला होता.

संबंधित शिवसैनिकांनी या चार्जिंग स्टेशनच्या अनुषंगाने हालचाली सुरू असल्याची कुणकुण लागताच त्यांनी संग्रहालयाच्या थेट इमारत परिसरात धाव घेत तेथील हालचालींची नोंद घेतली यावेळी शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय पतंगे हे तेथे घटनास्थळी दाखल झाले त्यांनी आंदोलकांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला असता आंदोलकांनी शिवाजी संग्रहालयाच्या परिसरात चार्जिंग स्टेशन उभारण्याच्या प्रक्रियेस विरोध केला कास परिसरात होणारे वाहनांचे प्रदूषण रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या पाच ई बसेस आणल्या आहेत.

या बसेसच्या माध्यमातून पर्यटकांना कास पठारावर पर्यटनासाठी जाता येणे शक्य होणार आहे या बससाठी छत्रपती शिवाजी संग्रहालयाच्या परिसरात चार्जिंग स्टेशन उभारले जात आहे ही इमारत बऱ्याच दिवसापासून जम्बो कोविड हॉस्पिटल साठी जिल्हा प्रशासनाच्या ताब्यात होती आता कुठे ती इमारत पुरातत्त्व विभागाच्या ताब्यात जाऊन येथे संग्रहालय सुरू करण्याच्या हालचाली गतिमान होत असताना मध्येच या भागात चार्जिंग स्टेशनचा घाट घातला जात असल्याने शिवसैनिक संतप्त झाले आहेत त्यांनी या धरसोड कारभाराचा निषेध केला आहे असे प्रकार आम्ही चालू देणार नाही असा इशारा शिवसेना शहर प्रमुख बाळासाहेब शिंदे यांनी यावेळी दिला आहे.

संबंधित एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जाब विचारला . आणि ते चार्जिग स्टेशन एसटी महामंडळाच्या जागेतच उभे करावे अशी जोरदार मागणी प्रणव सावंत आणि बाळासाहेब शिंदे यांनी केली याबाबत जर जिल्हा प्रशासनाने तातडीने निर्णय घेतला नाही तर तीव्र आंदोलन केले जाईल . मात्र हे स्टेशन संग्रहालयाच्या परिसरात उभे राहू नये अन्यथा आम्हाला शिवसेना साधने आंदोलन करावे लागेल असा इशारा बाळासाहेब शिंदे यांनी दिला आहे.


Back to top button
Don`t copy text!